पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पिढीकडे संक्रमित होत होते असे मानले जाते. ब्रह्मदेवाचा दिवस संपला की प्रलय काल सुरू होतो. दिवस सुरू झाला की सृष्टीची पुर्ननिर्मिती सुरू होते. सूर्याचंद्रमसौ धाता यथापूर्वकमकल्पयत् । दिवं च पृथिवीं चांतरिक्षमथोस्वः । । वेदामधील ही ऋचा संध्याविधी करतांना म्हटली जाते. त्याचा अर्थ आहे- कल्पपूर्व काळात जसे सूर्य, चंद्र, स्वर्ग, पृथ्वी, आकाश व वरचे सात (स्वर्गलोक) व खालचे सात (पाताल) लोक होते तसेच या कल्पातही विधात्याने निर्माण केले. अर्थात या बरोबरच शक्ती आणि ज्ञान पूर्वकल्पाप्रमाणे पुनर्प्रस्थापित झाले. वेदरुपी ज्ञान व वायूरुपी शक्ती पुन्हा अवतीर्ण झाले. आपलीही स्मृती झोपेमध्ये दररोज लुप्त होते. झोप संपल्यावर ती आपोआप जागी होते. त्याचप्रमाणे वेद नित्य आहेत. ज्ञान सर्वत्र आहे. ज्ञान म्हणजे स्मृती व विस्मरण म्हणजे अज्ञान अशी सुटसुटीत सोपी व्याख्या करता येईल. सांख्य व योग दर्शनकारांच्या मते वेद अपौरुषेय आहेत. कारण ते कोणी निर्माण केले हे सांगता येत नाही. सततची आराधना, साधना, उपासनेचे तप करणाऱ्या व्यक्तीला द्रष्टा किंवा ऋषि म्हणतात. तप करतांना त्यांना वेदाचे दर्शन होते, ज्ञान होते. वेदमंत्राचा उच्चार करण्यापूर्वी त्या मंत्राच्या ऋषिंचा नामोल्लेख केला जातो. हा उल्लेख मंत्रद्रष्टा म्हणून असतो कर्ता म्हणून नव्हे. समाधी अवस्थेमध्ये श्रवण झालेल्या मंत्रांना श्रुति - मंत्र म्हणतात. तसेच तपाचरणात असतांना स्फुरण झालेल्या मंत्रांना स्मृती - मंत्र म्हटले जाते. द्रष्टा म्हणजे जो दर्शन घेतो तो, श्रुत म्हणजे जे ऐकले जाते ते, स्मृत म्हणजे ज्या (ज्ञाना)ची स्मृती होते ते. पाहणे, ऐकणे, आठवणे या क्रिया केंव्हा शक्य होतात ? उत्तर सोपे आहे. कर्म अगोदर उपस्थित असेल तरच त्या शक्य आहेत. जेवणाचे ताट पुढे असल्याशिवाय खाण्याची क्रिया सुरु होईल का? यावरूनच वेद केंव्हा निर्माण झाले या प्रश्नाचे उत्तर आहे- वेद निर्माण झालेले नाहीत. ते आहेतच. ते कालातीत आहेत. ते शाश्वत आहेत. सूर्योपासनेचा उल्लेख वेदांमध्ये आहे. सूर्य आत्माजगततस्थुषश्च।। (ऋग्वेद, यजुर्वेद) शक्ती उपासना केंव्हा सुरू झाली ? त्यालाही हेच उत्तर ओघाने आलेच. आपण आईला नमस्कार करतो तो सविता सूर्यनारायणाला केलेला साष्टांगनमस्कार असतो. ती शक्तीचीच उपासना असते. अंबिका - कालिका- जगदंबा ही तिचीच रूपे आहे. अतिपूर्व काळातील नभोवंदन शिल्प, पुरातन सूर्यमंदिरे त्या त्या काळातील सूर्यनमस्कार एक साधना २७६