पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- जमीन पकडून उभे ठेवणे, त्याचे भरण-पोषण करणे, फुले-फळे- पाने - सावली निर्माणकरणे ही लाकडाची ऊर्जाशक्ती झाली. झाडातील अन्नरस शोषून घेण्याची क्षमता संपली की या 'जीवनशक्ती' चे रुपांतर सुरू होते. शिल्लक असलेल्या लाकडातून अनेक ऊर्जाशक्ती बाहेर पडतात. त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर होतो- घर, घरातील फर्निचर, डोली- नाव - जहाज तयार करणे; किटकांचे खाद्य, जनावरांचा आहार; इतर झाडांसाठी खत, रुग्णांसाठी औषध इत्यादी. याच लाकडात असलेली तेजऊर्जा किंवा अग्नीऊर्जा तर मानवाला मिळालेले वरदान आहे. अन्न शिजवून जठराग्नीस सहाय्य करणे, देहशकट मार्गस्थ ठेवणे, जहाज - आगगाडी यांना चलतऊर्जा देणे. पाणशक्ती-वीजशक्ती निर्माण करून सर्वसमावेशक व भीमकाय कामे लिलया करणे इत्यादी अनेक प्रकारची कामे या ऊर्जाशक्तीवर चालतात. जगातील प्रत्येक शक्तीचे रूपांतर वेगवेगळ्या उर्जेमध्ये होत असते. ही ऊर्जाशक्ती तसेच पृथ्वीच्या गर्भामध्ये आलेल्या लाव्हारसाची ऊर्जा एकच आहे. सर्व प्रकारच्या ऊर्जा सूर्यापासूनच निघतात. त्यांचा शेवटही सूर्यामध्येच होतो. हे निसर्गचक्र आहे. ते अव्याहतपणे सुरू असते. शक्तीचे रूप बदलते पण स्त्रोत मात्र शाश्वत असतो. अविनाशी असतो. या अविनाशी ऊर्जास्त्रोताचे म्हणजेच अगम्य परमतत्त्वाचे पूजन-अर्चन सूर्योपासनेतून सदा- सर्वकाळ सुरू असते. शक्ती आणि सामर्थ्य ही जोडगोळी यशोदायी आहे, शक्तीप्रमाणेच सामर्थ्यही शाश्वत आहे. एकावाचून दुसरा निष्प्रभ आहे. जीवन रथाची ही दोन चाके आहेत. एका चाकाला वेग आहे दुसऱ्यास नाही असे चालणार नाही. असे झाले तर रथ प्रगती पथावर राहणार नाही. तो जागेवरच वर्तुळाकारात फिरत राहील. सामर्थ्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत- ज्ञान, बुद्धी, प्रज्ञा, विवेक, युक्ती अधिकार इत्यादी. एखाद्याला अफाट शक्ती आहे पण वापरण्याचे ज्ञान नाही म्हणजे विनाश ठरलेला. शरीर स्तरावर प्रत्यक्ष अनुभूती मिळणे म्हणजे एखाद्या गोष्टीचे ज्ञान होणे. जे वेद्य आहे शाश्वत आहे ते सत्यज्ञान. बाकी इतर फक्त माहिती असते. 'विद्' या धातूपासून 'वेद' शब्द तयार झालेला आहे. या शब्दाचे अर्थ आहेत- जाणणे; असणे; लाभ होणे; विचार करणे इत्यादी. आपले वेद (ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद) सुमारे आठ-दहा हजार वर्षांपूर्वी लिखित स्वरूपात आले. त्यापूर्वी आठ-दहा हजार वर्षे मौखिक स्वरूपात ते एका पिढीकडून दुसऱ्या सूर्यनमस्कार एक साधना २७५