पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यनमस्कार ही नित्यकर्म उपासना आहे. साधना किंवा उपासना म्हणजे त्या विषयाचा अभ्यास करणे. त्याचा सराव करणे. त्या विषयाशी संपूर्णपणे एकरूप होणे असा आहे. आजकाल अभ्यास हा शब्द विद्यार्थी परीक्षा - गुणदान एवढ्यापुरताच संकुचित झालेला आहे. ब्रह्मकर्मांतर्गत नित्यकर्म म्हणजे आपले स्वतःचे व आपल्या वैश्विक कुटुंबातील प्रत्येकाचे जन्म-जीवन-मृत्यू हे निसर्ग चक्र आनंदी व सुखावह करण्यासाठी केलेला प्रयत्न असा आहे. (संदर्भ घ्या- पूर्वार्ध, नित्यकर्म) ब्रह्मकर्म अनेक आहेत त्यातील सूर्योपासना हा एक प्रकार आहे. सूर्योपासना सुद्धा असंख्य आहेत. त्या दोन भागामध्ये विभागता येतात. एक आहे कायिक सूर्योपासना दुसरी आहे मानसिक सूर्योपासना कायिक उपासनेतील एक प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार. सूर्योपासनेचे संदर्भ वेद, शास्त्र, पुराणे, उपनिषदे, अरण्यके इत्यादी सर्व अध्यात्मिक पुस्तकात सापडतात. इतकेच काय सर्व पंथ - संप्रदाय - धर्मियांच्या दैनिक उपासनेच्या पुस्तकामध्ये सूर्योपासनेचे संदर्भ या ना त्या स्वरूपात वाचावयास मिळतात. शक्तीची उपासना म्हणजे सूर्यदेवतेची उपासना सूर्यनारायणाच्या ऊर्जेमुळेच हे निसर्गचक्र, ब्रह्मचक्र चालू आहे. ही शक्ती उपासना सर्वत्र-सर्वकाळ- जगभर अव्याहतपणे सुरू आहे. त्यामध्ये कधीही खंड पडत नाही. यावेळेला आता मी सूर्यास्ताचे दर्शन घेतो आहे. पण जगाच्या विरूद्ध दिशेला सूर्योदय होतो आहे. त्या ठिकाणी प्रातःसंध्येची उपासना सुरू आहेच. सूर्यनारायणाचे दर्शन ज्या भागात होते तेथे सूर्योपासना सुरू होते. आदित्य नारायणाचे दर्शन घेण्यासाठी, त्याचे स्वागत करण्यासाठी शक्तीउपासक सदा सर्वदा - सर्वठिकाणी अधीरतेने त्याची प्रतिक्षा करीत असतात. ही उप+आसनेची प्रतिक्षा अनादी कालापासून सुरू आहे. सूर्योदय-सूर्यास्ताचे अलैकिक जोपर्यंत आहे तो पर्यंत ही सूर्योपासना चालू राहणार आहे. जगबुडी झाल्यावरच ही शक्ती उपासना थांबणार आहे. तीही फक्त काही काळ. वैज्ञानिक सिद्धांताप्रमाणे शक्ती किंवा ऊर्जा कधीही नष्ट होत नाही. ती रुपांतरित करता येते पण तिचा नाश करता येत नाही. शक्तीचा वापर होतो म्हणजे ती संपुष्टात येत नाही तर त्या शक्तीचा फक्त प्रकार बदलतो. झाडाच्या बुंध्यामधे पाणी आणि लाकूड आहे. त्यामध्ये ताकद आहे. लवचिकता आहे. झाड सूर्यनमस्कार एक साधना २७४