पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांनी भक्तांना दिला. आत्मतेज वाढविण्यासाठी सूर्योपासनेची दीक्षा दिली. प्रत्यक्ष प्रचिती दिली. समाजामध्ये असलेल्या पराभूत वृत्तीवर फुंकर घालून अंतःकरणातील स्वाभिमान - स्वदेशप्रेम - हिंदवीस्वराज्य याचा वह्मी पुन्हा चेतविला आधुनिक भारताची दोन जगप्रसिद्ध शक्तीपीठे नाशिक शहरात आहेत. एक शक्तीपीठ आहे आगर टाकळी (नासिक) या ठिकाणी हे जागृत स्थळ समर्थ रामदास स्वामीं यांची सूर्योपासनेची तपोभूमी आहे. सर्वजगाने सूर्यनमस्कार या व्यायाम प्रकाराला मान्यता दिलेली आहे. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनमस्कार घालून जागतिक सूर्यनमस्कार दिन जगभर साजरा केला जातो. दुसरे शक्तीपीठ आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव भगूर (नासिक) यथे. स्वातंत्र्यवीर सावरकर रामदास स्वामींचे अनुयायी होते. त्यांनी 'मॅझिनी' चे चरित्र लिहिले. या पुस्तकात त्यांनी इटालियन हृदयसम्राट जूसेपी मॅझिनी १८०५ - १८७२ Giuseppe Mazzini Soul of Italy याच्या कार्याची ओळख जगाला करून दिली. परकियांच्या सत्तेत असणाऱ्या अनेक राज्याचे विलिनीकरण करून इटलीचे स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्र व्हावे हे या राष्ट्र पुरूषाचे स्वप्न. या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आम जनतेचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन त्यांनी हे स्वप्न साकार केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मॅझिनिला 'इटलीचा रामदास' ही मानाची उपाधी देऊन त्याच्या कार्याचा गौरव केलेला आहे. बाराशे सूर्यनमस्कार घालणे अवघड आहे पण अशक्य नाही हा विचार तुमच्या मनबुद्धीने स्वीकारला असल्यास हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न आजपासूनच सुरू करा. श्री. युवराज माने यांचा आदर्श घ्या. त्यांच्या बरोबर सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक सार्वजनिक ठिकाणी करा. सूर्यनमस्काराचा संदेश समर्थपणे संपूर्ण जगभर घराघरात पोहचवा. प्रश्न- अ) सूर्यनमस्कार नित्यकर्म आहे. तो एक धार्मिक विधी आहे. असे असेल तर विधी कसा करावा, विधी करण्याची पोथी किंवा काही श्लोक पुरातन धर्मग्रंथामध्ये सापडतात कां ? सूर्यनमस्कार नक्की केंव्हा सुरू झाले हे सांगता येईल कां? या साधनेतील स्थित्यंतरे केव्हा कशी घडली याचा मागोवा घेता येतो कां ? शंका समाधान सूर्यनमस्कार एक साधना - २७३