पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

● संख्येची खातरजमा केली होती. १९३२ साली मसूरकर आश्रमाने सूर्यनमस्कार शिबिर अयोजित केले होते. त्यावेळी तेथील चावडी चौकात श्रीमती. द्वारकाबाई कुर्लेकर यानी बाराशे सूर्यनमस्कार घालण्याचे प्रात्यक्षिक सादर केले होते. आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांचा मुक्काम त्यावेळी कऱ्हाड येथे होते. ते स्वतः या प्रात्यक्षिकाला उपस्थित होते. • धर्मभास्कर श्री. विनायक महाराज मसूरकर यांच्या वंशातील एक सदस्य श्री मोरेश्वर जोशी (हल्ली मुकाम पुणे) यांचे वडील, काका बाराशे सूर्यनमस्कार घालत असत. आजही खेड्या-पाड्यातील व्यायाम शाळेत हजार-बाराशे जोर-बैठका मारणारे, सूर्यनमस्कार घालणारे तरूण बरेच आहेत. • श्रीमंत भाऊसाहेब पेशवे दररोज बाराशे सूर्यनमस्कार घालीत होते असा एक दस्तऐवज इतिहास संशोधन मंडळ, पुणे येथे आहे. • श्रीमंत बाळासाहेब पंत, औंध (सातारा) यांनी स्वतः अठरा वर्षे सूर्यनमस्काराची साधना केली. त्यानंतर त्यांनी सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार आवश्यक केला. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर झालेला परिणाम बघून त्यांनी सूर्यनमस्कार विषयावर एक पुस्तिका (१९२६) लिहिलेली आहे. ● १८ डिसेंबर २००९ या दिवशी कोल्हापूरचे श्री. युवराज माने यांनी सूर्यनमस्कारामध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी प्रथम एका तासात आठशे सव्वीस जोर काढले आणि जोर मारण्याचा पूर्वीचा विश्व विक्रम मोडला. त्यानंतर लगेच सहा तासात एक हजार दोनशे बारा सूर्यनमस्कार घातले. या त्यांच्या विश्व विक्रमाची नोंद लिंमका बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड यामध्ये करण्यात आलेली आहे. (संदर्भ घ्या उत्तरार्ध, मानाचा मुजरा) - सकळ दोषांचा परिहार । करिता सूर्यास नमस्कार। स्फूर्ती वाढे निरंतर्। सूर्यदर्शन घेता || श्रीमद् दासबोध १६.२ सद्गुरू समर्थ रामदास स्वामींचे ग्रंथ व त्यांचे कार्य सूर्योपासना/ बलोपासनेचे मूर्तीमंत उदाहरण आहे. सूर्यनमस्कार साधनेतून सकळ दोषांचे- अध्यात्मिकताप, आदिभूतिकताप, आदिदैविकताप- रोग-व्याधी-विकार दूर होतात हा संदेश सूर्यनमस्कार एक साधना २७२