पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येणे शक्य आहे कां? या प्रश्नांची नकारार्थी उत्तरे देऊन 'वास्तवता' समोर ठेवण्याचा आव आणतात. हे लोक एकतर सूर्यनमस्कार साधक नसतात. असलेच तर त्यांना या साधनेची अनुभूती शरीरस्तरावर आलेली नसते. किंवा सूर्यनमस्कार या भारतीय पुरातन कलेबद्दलचा त्यांचा अभ्यास अपूर्ण असतो. त्यामुळे असे चुकीचे निष्कर्ष काढले जातात. कारण कोणतेही असो हा प्रश्न सर्वांचा झालेला आहे. हा प्रश्न आपण प्रातिनिधिक स्वरूपात मांडलेला आहे. त्याबद्दल पुन्हा अभिनंदन करून प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तसं म्हटले तर, मी उत्तर देणार नाही. योग्य उत्तर तुमचे तुम्ही शोधायचे आहे. मी फक्त मला असलेली काही सांख्यिकी माहिती, प्रत्यक्ष घडलेले प्रसंग व काही महत्वाचे ऐतिहासिक उल्लेख तुमच्यासमोर ठेवणार आहे. ही सर्वच माहिती तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याची मला पूर्ण खात्री आहे. मदत योग्य कां अयोग्य ती घ्यायची का नाकारायची हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझा शिक्षकीपेशा व एक सूर्यनमस्कार साधक या दोन्ही भूमिकेतून ही माहिती मुद्यांच्या स्वरूपात आपल्यासमोर ठेवतो आहे. त्यावर भाष्य करणार नाही. समर्थ रामदास स्वामी सर्व शक्तीउपासकांचे दैवत आहे. मारुतीरायांचा अवतार आहेत. मीही एक उपासक आहे. तरीही श्रद्धा बाजूला ठेऊन निखळ माहिती त्रयस्तपणे देण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्व सूर्यनमस्कार साधकांना नम्र विनंती की खाली दिलेल्या माहितीला पूरक असलेली किंवा विरोधात अस माहिती तुमच्याकडे असल्यास ती जरूर कळवा. त्याचा सांगोपांग विचार करून माझी आणि आपली सर्वांची श्रद्धा अधिक डोळस करण्याचा प्रयत्न करीन. कारण श्रद्धा ही कार्यशक्तीला मनःसामर्थ्याची जोड देणारी असते तर प्रयत्नांचे पंख कापण्याचे शस्त्रसामर्थ्य अंधश्रद्धेत असते. सद्गुरू समर्थरामदास स्वामी आगर टाकळी नासिक (महाराष्ट्र) येथे बाराशे सूर्यनमस्कार घालत होते. या विधानाला पुष्टी देणारी काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे- बारा आसन स्थिती असलेला एक सूर्यनमस्कार पद्धतशीरपणे घालण्यासाठी चार श्वासोच्छ्वासाचा कालावधी लागतो. या प्रकारच्या सूर्यनमस्कारात सूर्यनमस्कार एक साधना २६९