पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तास फक्त चोवीसच आहेत. हे कसे शक्य आहे? दररोज सूर्यनमस्कार घालतांना हा विचार मनात येतो. मन विचलित होते. बाराशे सूर्यनमस्कार घालणे शक्य आहे कां? ते कसे घालता येतात? कृपया स्पष्ट करावे ही विनंती. शंका समाधान आपण विचारलेला प्रश्न फार महत्वाचा आहे. वैशिष्ट्यपूर्ण आहे. 'मन विचलित होते' या शब्दातून मन-बुद्धीचे आपले द्वंद्व स्पष्टपणे लक्षात येते. आपण दररोज सूर्यनमस्कार साधना करता आहात. सूर्यनमस्कार या विषयाची मिळालेली माहिती अनुभवाच्या कसोटीवर घासून पाहत आहात. बुद्धीचा वापर करून त्याबाबत निर्णय घेता आहात. आपली श्रद्धा डोळस आहे. आपल्या मनात खोलवर कुठेतरी हा ठाम विश्वास आहे की समर्थ बाराशे सूर्यनमस्कार घालत होते. एखाद्या अनुभवी साधकाकडून या विश्वासास मान्यता घ्यायची. यातून समर्थ निष्ठा व श्रद्धा वाढवायची. इत्यादी आपले व्यक्तीगत विशेष या प्रश्नातून माझ्या लक्षात आले. त्याचा मुद्दाम उल्लेख करतो. साष्टांग नमस्कार ( सूर्यनमस्कार) या पुरातन भारतीय विद्येबद्दल आपल्याला वाटत असलेल्या अभिमानाला प्रथम अभिवादन करतो. सामान्यपणे सूर्यनमस्काराची साधना सुरू झाली की पहिल्या दिवसापासून ही शंका साधकाचे मनात घर करते. मी आज तीन सूर्यनमस्कार घालण्याचा प्रयत्न केला. शरीर स्तरावर याची जबरदस्त अनुभूती मिळाली. बाराशे सूर्यनमस्कार मला घालता येतील कां? यासाठी किती दिवस प्रयत्न करावे लागतील? मला ते जमेल कां? वगैरे प्रश्नांची मालिका सुरू होते. साधनेतील प्रगती या प्रश्नमंजुषेतूनच सुरू होते असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. जे सूर्यनमस्कार घालत नाहीत ते तर बाराशे सूर्यनमस्कार व त्यासाठी लागणारा वेळ यांचे (चुकीचे) गणित मांडून ही गोष्ट अशक्य आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये वास्तवता कमी समर्थांचे उदात्तीकरण जास्त आहे असे प्रतिपादन करतात. ऐकणारे सर्वचजण त्याला 'मान डोलवतात'. कारण हे नकारार्थी उत्तर गणिती बुद्धीने काढलेले असते. तीन सूर्यनमस्कारामध्ये वापरलेली ऊर्जा चारशेपटीने अधिक वापरता येईल कां? तसेच एका सूर्यनमस्काराला इतका वेळ तर बाराशे सूर्यनमस्काराला लागणारा वेळ किती? तो दररोज देता सूर्यनमस्कार एक साधना २६८