पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टिकते. दिवस सुरू झाल्यावर विश्वाची निर्मिती होण्यास पुन्हा सुरूवात होते. कालचक्राचे हे चक्र आहे. हे एक अतीविराट मंडलच आहे. स्नायुपेशीतील अणू-रेणुची भ्रमण कक्षा हे लघुमंडल व कालचक्राचे मंडल हे विराट मंडल. मंडलाची ही दोन टोके अतिसूक्ष्म व अतिविशाल या स्वरूपातील आहेत. या दोन मंडलातून असंख्य मंडलांचे तरंग निर्माण झालेले आहे. उदाहरणार्थ श्वास, भूक, तहान, निद्रा, भय, चिंता, शोक यांचे मंडल आपण अनुभवतो. ऊन- सावली, गार - थंड, सुख-दुःख, असणे-नसणे, ज्ञान - अज्ञान, चल-अचल, खाली-वर, दिवस-रात्र, प्रकाश - अंधार, जन्म - मृत्यू इत्यादी द्वंद्व आपल्याला चांगले परिचित आहेत. धान्याची पेरणी कापणी, फुले-फळे, बीज-रोप, उदय- अस्त, सूर्य-चंद्र, उन्हाळा - पावसाळा, थंडी- गर्मी, पाऊस-वारा ही निसर्ग मंडले फेरधरून नाचत असतात. त्यांच्या नृत्यामध्ये आपणही सहभागी असतोच. शरीरातील स्नायूपेशींच्या तीन गती आहेत (संदर्भ घ्या- पूर्वार्ध स्वाधिष्ठान चक्र). त्याच प्रकारच्या तीन गती विश्वाच्या आहेत. विश्वातील प्रत्येक मंडलाच्या तीन अवस्था आहेत- जन्मपूर्व अवस्था, प्रत्यक्ष अस्तित्व आणि मुत्यूनंतरची स्थिती. ही सर्वमंडले, त्यांची गती व स्थिती ही एकमेकाला पूरक आहेत तसेच ती एकमेकावर अवलंबून आहेत. गती देणारा मात्र स्वयंभू आहे. शाश्वत आहे. भगवान आहे. आत्माराम आहे. हृदय सिंहासनाधीश्वर मार्तंडवंशावतंस भगवान प्रभूरामचंद्रास प्रथम सर्वभावे वंदन करून 'मंडलात' मध्यवर्ती असणाऱ्या सूर्यनारायणाची उपासना करायची आहे. समर्थ रामदास स्वामीनी भारतभ्रमण केले. मठ-मंदिर-मारूती यांची प्रतिष्ठापना केली. समाजाला सूर्योपासनेचे, शक्तीउपासनेचे पाठबळ दिले, परमेश्वराचे अधिष्ठान दिले. रामराज्याची, स्वराज्याची स्थापना प्रत्यक्षात आणली. सूर्यनमस्कार साधनेतून सद्गुरू समर्थ रामदास स्वामींची पाद्यपूजा करण्याची, देशसेवा करण्याची माझी मनोकामना पूर्ण व्हावी हा भाव लक्षात घेऊन दैनिक साधनेस सुरूवात करायची आहे. प्रश्न अ) समर्थ रामदास स्वामी बाराशे सूर्यनमस्कार घालत असत. एक सूर्यनमस्कार पूर्ण करण्यास साधारणपणे एक मिनिटाचा वेळ लागतो. म्हणजे बाराशे सूर्यनमस्कार घालण्यास बाराशे मिनिटे किंवा वीस तास लागतात. दिवसाचे सूर्यनमस्कार एक साधना २६७