पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाल्यामुळे जादा ऊर्जा तयार झाली. ही ऊर्जाशक्ती चुंबकीय आकर्षण या स्वरुपात आपल्याला अनुभवता आली. करन्यासामध्ये आपण अनुभवलेला हा शक्तीचा प्रवाह निसर्गामध्ये कायम स्वरुपी आहे. तो शाश्वत आहे. त्याला आदि-अंत नाही. ते एकमेवाद्वितीय अंतिम सत्य आहे. त्यालाच सत्यं शिवं - सुंदरम् हे विशेषण वापरतात. तेच विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहे. तिचेच दुसरे रूप आदिशक्ती आहे. आपण उच्छ्वासावाटे वापरलेले प्राणतत्त्व शरीराबाहेर टाकतो. शरीर मात्र पूर्णपणे निर्वात कधीच होत नाही. शरीरातून प्राण बाहेर गेल्यावरच निर्वात शरीर (काही तासाने) शिल्लक राहते. शरीरामध्ये शिल्लक असणा-या या वायुला शेषवायू किंवा शेषप्राण असे म्हणतात. हाच शेषशायी भगवान. याचा निवास आपल्या अंतःकरणात आहे. त्याच्या हातात शंख-चक्र ही आयुधे आहेत. तुम्हास युद्धास प्रवृत्त करणे, प्रशिक्षण देणे, यशदेणे, विजयवार्ता सर्वदूर प्रक्षेपित करणे यासाठी तो सदैव उत्सुक आहे. प्रत्येक स्नायूपेशींच्या केंद्रस्थानी अणू-रेणू आहेत. त्यांच्या मंडलाकृती भ्रमणकक्षेमध्ये हा केंद्र स्थानी आहे. हा महाप्रतापी आहे. अणूचे विघटन केले की अणुशक्ती निर्माण होते हे आपल्याला माहीत आहे. तोच आपले भरण-पोषण-संवर्धन-संचलन करतो. तोच आपला प्राण आहे. ‘पिंडी' ते ब्रह्मांडी या न्यायाने ब्रह्मांडमंडलाचा आत्माही सूर्यनारायण आहे. वेगळ्या शब्दामध्ये सांगायचे झाल्यास हा विश्वाचा प्राण आहे. याच्यामुळेच विश्वाचे भरण-पोषण-संवर्धन होते. म्हणून तो ब्रह्मांडनायक आहे. प्रत्येक स्नायूपेशींमध्ये असलेले हे मंडल व त्यामध्ये असलेले शक्तीतेजाचे अस्तित्व आपण पाहिले. विश्वामधील हा एक लघुमंडलाचा प्रकार झाला. आकाशात असंख्य सूर्यमाला आहेत. या सूर्यमाला व त्यातील ग्रह - गोल-तारे हे एक महाकाय मंडलच आहे. कालचक्राचे मंडल हेही एक विराट मंडलच आहे. श्रीमद् दासबोध यामध्ये समर्थांनी पंचप्रलयाचे वर्णन केलेले आहे. यामध्ये ब्रह्मांड प्रलयाचे वर्णन आलेले आहे. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे कल्प किंवा सर्ग. ब्रह्मदेवाचा एक दिवस चार अब्ज बत्तीस कोटी वर्षांचा असतो. ब्रह्मदेवाचा दिवस पूर्णहोणे म्हणजे एका कल्पाचा अंत होणे. रात्र सुरू झाली की विश्वाचा प्रलय म्हणजेच ब्रह्मदेवाची निद्रा सुरू होते. ही जगबुडी ब्रह्मदेवाची निद्रा संपेपर्यंत सूर्यनमस्कार एक साधना २६६