पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्तुळ, वाटोळे वेढे असे शब्दप्रयोग आपण नेहमी वापरतो. वर्तुळ, गोल, वाटोळे इत्यादी आकार म्हणजेच पूज्य किंवा शून्य. शून्यत्व अभाव दर्शविणारे चिन्ह आहे. शून्य हे प्रतिक गुणभाव - स्थिती - वस्तू यांचा अभाव दर्शविते. त्याच प्रमाणे ब्रह्मांडाचा निर्देशही शून्य म्हणूनच करतात कारण त्याचा आकारही गोलाकार आहे. त्याला गती आहे. या गतीची सुरूवात कोठेतरी झालेली आहे ती केंव्हातरी संपणार आहे आणि म्हणून ते एक मोठे शून्य आहे. भिंगरीला गती दिली की थोड्या वेळाने ती थांबते. शून्य होते. भिंगरी संपते. लाकूड शिल्लक राहते. भिंगरीला गती देणारा मात्र लाकूडही संपले तरी तसाच कायम राहातो. शून्य हे नेहमी पूर्णच असते कारण गतीचा शेवट तिच्या आरंभ बिंदुमध्ये होऊन तेथूनच पुन्हा गतीचे पुढचे आवर्तन सरू होते. मंडलांचे आवर्तन म्हणजेच गती किंवा हालचाल असे म्हणता येईल. मंडलाचे आदि - अंत एकत्र आले की मंडल पूर्ण होते. मंडलाचे आवर्तन थांबले की गती थांबते. मंडलाचे अस्तित्व संपते. खाली शून्य रहाते. हे गतीमंडल ब्रह्मगतीमध्ये विलीन होते. गतीदेणारा मात्र सदासर्वकाळ 'शेष' राहतो. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।। या जगत् सृष्टीचे कारण असलेला निर्गुण-निराकार ब्रह्म पूर्ण आहे. हे जगतब्रह्मही पूर्ण आहे. पूर्ण परब्रह्मामुळे हे जगतब्रह्म प्रगट होते. प्रलयकाळात किंवा अज्ञानाचा नाश झाल्यावर हे जगतब्रह्म पूर्णब्रह्मामध्ये विलीन होऊन पुन्हा पूर्णब्रह्म शिल्लक राहते. निर्गुण-निराकार असलेल्या पूर्णब्रह्माची प्रत्येक कृती किंवा निर्मिती पूर्णब्रह्म स्वरूप आहे. करन्यासाची कृती संपल्यावर आपल्या तळहातावर चुंबकीय आकर्षण जाणवले. (संदर्भ घ्या- पूर्वांर्ध, करन्यास कृती.) करन्यास करतांना प्रत्येक पेशीकेंद्रातील अणु-रेणूच्या भ्रमण कक्षेवर दाब दिला. हा दाब देतांना शरीर- मन-प्राण यांची मदत घेतली. पेशीकेंद्राचे स्पंदन प्रभावित केले. पेशींचे स्फूरण पावणे व पुन्हा मूळपदावर येणे हेही एक मंडलच आहे. ही मंडलगती प्रभावित सूर्यनमस्कार एक साधना २६५