पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामराज्याची स्थापना करा. स्वराज्याची स्थापना करा. प्रार्थना म्हणतांना या अर्थाचेही मनन करणे गरजेचे आहे. आवाहन प्रार्थनेमधील दुसरा भाग येतो तो त्या देवतेमध्ये असलेल्या दैवी गुणांचा. दैवी सामर्थ्याचा संकटातून मुक्तता मिळविण्यासाठी आपण सर्वचजण दैवी आधार शोधतो. आपल्याला संकटमुक्त करण्याचे सामर्थ्य या देवतेचे आहे हे समजल्यानंतर त्याला मदतीचे आवाहन करतो. नारायणाची ही मदत कार्यशक्तीच्या स्वरूपाची नाही. युद्ध जिंकण्यासाठी तो आपले सैन्य तुम्हाला देणार नाही. तो तुम्हाला फक्त सामर्थ्य देणार आहे. तुमच्या शरीरुपी शकटाच्या घोड्यांचे सारथ्य करणार आहे. मनाच्या मर्कट चाळ्यांना काबूत ठेवून मनःसामर्थ्य मनोजवं मारुततुल्यवेग्ं। जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् । असे करणार आहे. या सारथ्याचे अधिष्ठान ठेवून युद्ध तुम्हीच करायचे आहे. शत्रूवर विजय मिळवायचा आहे. सर्व संकटांना यशस्वीपणे तोंड द्यायचे आहे. हे सर्व प्रत्यक्षात प्राप्त होण्यासाठी प्रत्येक कृतीला या प्रत्यक्ष परमेश्वराचे अधिष्ठान आवश्यक आहे. ते मिळावे म्हणून त्याची प्रार्थना करायची आहे. सूर्यनमस्कार साधनेतील आवाहन प्रार्थनेतील पहिल्या चरणामध्येच 'मंडल मध्यवर्ती’ हे सूर्यनारायणाचे विशेषण आलेले आहे. विश्वव्याप्त व संपूर्ण चल- अचल सृष्टीचा पालनकर्ता म्हणून या ब्रह्मांडनायकाचा उल्लेख प्रार्थनेत सुरूवातीलाच केलेला आहे. हे शब्द आदित्यनारायणाचे सामर्थ्य दर्शविण्यासाठी वापरलेले आहेत. (प्रार्थनेतील इतर शब्द त्याच्या रूपाचे दर्शन घडवितात.) तसेच हे सामर्थ्य सर्वोच्च व सर्वव्याप्त आहे याकडेही निर्देश करणारे आहेत. या दोन शब्दांमध्ये अखील ब्रह्मांड एकवटलेले आहे. सूर्य आत्माजगततस्तस्थुषस्च्य || हेच वर्णन यामध्ये अभिप्रेत आहे. मंडल या शब्दाचा अर्थ आहे गोल किंवा वाटोळा आकार. ही आकाराची संकल्पना स्थैर्य, स्थिरता दर्शविते. आकार काय आहे कसा आहे हे सांगण्याचे काम हा शब्द करतो. पण मंडल या शब्दामध्ये गती आहे. गतीला सुरुवात असते. जेथे सुरुवात आहे त्या ठिकाणी येऊनच तिचा शेवट होतो. पुन्हा तेथूनच सुरूवात होते. गतीची सुरुवात मंडलात होते आणि शेवटही मंडलातच होतो. मंडल या शब्दाला पर्यायी शब्द द्यायचा झाल्यास वर्तुळ हा देता येईल. गोल सूर्यनमस्कार एक साधना २६४