पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर्व हवा बाहेर टाकण्याचा प्रयत्न करा. नंतरच पुढील सूर्यनमस्कार घालायला सुरूवात करा. श्वसनाच्या दृष्टीकोनातून चारही मंत्रातील वाढती श्रेणी लक्षात येण्यासाठी प्रत्येक गटातील पहिला सूर्यमंत्र + एक सूर्यनमस्कार घालून बघा. या अनुभवातून सूर्यमंत्राचा वापर इतर अनेक पद्धतीने करता येईल हे तुमच्या लक्षात येईल. मात्र साधनेच्या सुरूवातीच्या काळामध्ये सूर्यमंत्राचा पहिला गट वापरणेच इष्ट आहे. ब) सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात करण्यापूर्वी आपण प्रार्थना म्हणतो ध्येयः सदासवितृ मंडल मध्यवर्ती मंडल या शब्दाचा अर्थ आकाश. आकाशामध्ये मध्यवर्ती असणाऱ्या सूर्यनारायणाचे ध्यान (मी) करतो. हा या ओळीचा सरळ अर्थ आहे. याचे अन्वयार्थ अनेक प्रकारे लावले जातात. मंडळ या शब्दाचे इतर काही अर्थ आहेत कां ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात करण्यापूर्वी सूर्यनारायणाची केलेली ही प्रार्थना आहे. यामध्ये सूर्यदेवतेला आवाहन केलेले आहे. आदित्य नारायणाने माझी पाद्यपूजा स्वीकारावी म्हणून त्याला केलेली ही प्रार्थना आहे. या आवाहनामध्ये दोन भाग प्रामुख्याने करता येतात. एक त्या देवतेची प्रतिमा. तिचे दिसणे, तिची अंगकांती, अंगावरील अलंकार, बसण्याचे आसन, देवतेचे वाहन इत्यादी वर्णन थोडक्यात केलेले असते. देवतेने धारण केलेले शस्त्र व अस्त्र इत्यादींचा उल्लेखही या रूप-वर्णनाचा भाग असतो. (आपल्या प्रत्येक देवतेच्या हातात शस्त्र आहे. मात्र हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी एकही धर्मयुद्ध झालेले नाही. हा विरोधाभास का व कसा हेही समजून घेतले पाहिजे.) ही सर्वच शस्त्रे त्यांची नावे, व ते धारण करण्याचा अन्वयार्थ याकडे प्रथम लक्ष द्यावयास हवे. शरीर हेच कुरुक्षेत्र आहे आणि मनाला काबूत ठेवण्यासाठी शक्ती-बुद्धी किंवा शक्ती- सामर्थ्य यांचा योग्य उपयोग करणे हा संदेश यामध्ये आहे. शंखध्वनी हा युद्धारंभ व विजयानंद यांचा संदेश सर्वदूर प्रक्षेपित करणारे आहेत. सूर्यनारायणाच्या हातातील शंख युद्धास आरंभ करा. तुमचा विजय निश्चित आहे. याची ग्वाही देणारा आहे. चक्र हे ऊर्जा-शक्ती- सामर्थ्याचे प्रतिक आहे. स्वयंचलित गती असणारे अस्त्र आहे. आपले शक्ती- सामर्थ्य गतीमान- वर्धिष्णू ठेवा आणि विकार - वासनावर विजय निश्चित करा. 'देहपूर' मध्ये सूर्यनमस्कार एक साधना २६३