पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दमण्या-थकण्यावर सूर्यमंत्रांचा उपचार होतो. बारा सूर्यमत्रांचे दोन, चार, बारा असे विभाग करून ते म्हटले जातात. त्यामुळे दोन सूर्यनमस्कारात विश्रांती मिळते तसेच प्राणतत्वाचा पुरवठा शरीराला अधिक प्रमाणात होतो. एकूण १२+१२+१२+१२+१=४९ सूर्यनमस्कार तुम्ही घालणार आहात. यामध्ये पहिले बारा सूर्यनमस्कार- तीन नियंत्रित गती व नऊ गतीयुक्त या पद्धतीने घालायचे आहेत. पुढील बारा + बारा सूर्यनमस्काराचे गट एक सूर्यमंत्र म्हणून लगेच एक संपूर्ण सूर्यनमस्कार असे २४ सूर्यनमस्कार घालायचे आहेत. शेवटचा बारा सूर्यनमस्काराचा गट हा पुढील प्रमाणे मंत्राची योजना करून घालायचे आहेत. सहा सूर्यनमस्कार दोन सूर्यमंत्र एकत्र करून, तीन सूर्यनमस्कार चार सूर्यमंत्र एकत्र करून, पुन्हा तीन सूर्यनमस्कार बारा सूर्यमंत्र एकत्र करून घालायचे आहेत. + एक सूर्यनमस्कार 'श्री सवितृसूर्यनायरायणायनमोनमः' हा मंत्र म्हणून घालायचा आहे. - याचा उद्देश स्पष्ट होण्यासाठी व्यायाम करतांना तो तुमच्या क्षमतेच्या निम्याने करायचा आहे हे प्रथम लक्षात घ्या. तुमची एकूण शरीरिक क्षमता लक्षात घेता साधारणपणे शंभर सूर्यनमस्कार तुम्ही सहजपणे घालू शकता अशी परिस्थिती गृहित धरा. आज एकोणपन्नास सूर्यनमस्कार घालायचे आहेत. त्यातील पहिले बारा सूर्यनमस्कार हे शरीराला ताण - दाब स्वीकारण्याची पूर्वसूचना देणारे व दीर्घश्वसनास सुरूवात करणारे आहेत. पुढील बारा+बारा सूर्यनमस्कार घातल्यावर शरीर अजिबात थकलेले नसतांनाही थोडं थांबण्याची आवश्यकता भासेल किंवा भासते. या ठिकाणी दीर्घश्वसन व शरीरक्रिया यांचा ताळमेळ घालण्यासाठी ते आवश्यकही असते. पुढील बारा सूर्यनमस्कार दोन, चार, बारा सूर्यमंत्रांचा गट करून अनुक्रमे सहा, तीन, तीन असे सूर्यनमस्कार घाला. यातून हळू हळू श्वसनाचा ताल व शरीराची लय पकडून डौलदार सूर्यनमस्कार घालता येतील. समंत्रक सूर्यनमस्कार या भागामध्ये चार प्रकारचे मंत्र दिलेले आहेत. प्रत्येक मंत्राचा उच्चारणकाल हा वाढत्या श्रेणीमध्ये आहे. सूर्यनमस्कार सरावातून श्वसन संस्था विकसित होते. हळू हळू मंत्र उच्चारणाच्या मात्रेपेक्षा उच्छ्वासाची प्रक्रिया अधिक वेळ चालते. अशावेळी पुढील मंत्राचा सराव सुरू करणे सहज शक्य होते. ते जमत नसेल तर मंत्रोच्चार पूर्ण झाल्यावरही शरीरातून शक्य तेवढी सूर्यनमस्कार एक साधना २६२