पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निकष काय याचे मार्गदर्शन करावे. ब) सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात करण्यापूर्वी आपण प्रार्थना म्हणतो ध्येयः सदासवितृ मंडल मध्यवर्ति ... मंडल या शब्दाचा अर्थ आकाश. आकाशामध्ये मध्यवर्ती असणाऱ्या सूर्यनारायणाचे ध्यान (मी) करतो. हा या ओळीचा सरळ अर्थ आहे. याचे अन्वयार्थ अनेक प्रकारे लावले जातत. मंडळ या शब्दाचे इतर काही अर्थ आहेत कां? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. शंका समाधान अ) सूर्यनमस्कार अनेक प्रकाराने घालता येतात. त्याचा उल्लेख यापूर्वी येऊन गेलेला आहे. तो पुन्हा सांगत नाही. नित्य सरावातून या साधनेतील कौशल्य उमलते. साधकाची स्वत:ची सूर्यनमस्कार पद्धती विकसित होते. त्यासाठी साधकाला वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. साधना सुरू असेपर्यंत तुमचा आत्माराम शरीराला सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण देत असतो. त्यामुळे आज तुम्ही ज्या पद्धतीने सूर्यनमस्कार घातलेले आहेत तो प्रकार आदर्श सूर्यनमस्कार असतो. कारण स्नायूंचे कोणतेही दुखणे सुरू न होता सूर्यनमस्कार साधना अखंडितपणे सुरू ठेवणे हेच आपले दैनंदिन साधनेतील उद्दिष्ट आहे. स्नायूंची लवचिकता वाढणे, त्यांची ताण सहन करण्याची क्षमता वृद्धिंगत होणे, रोग प्रतिकार शक्ती वाढणे वगैरे शारीरिक-मानसिक फायदे कौशल्या बरोबर मिळणार आहेतच. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. कारण ही प्रक्रिया वेळ घेणारी आहे. स्नायूपेशींच्या सवयी बदलण्यासाठी त्यांना दिलेले हे संस्कार प्रशिक्षण आहे. संस्कार अप्रत्यक्षपणेच करायचे असतात. अन्यथा प्रशिक्षणार्थी पळून जाईल. शिकण्याची धास्ती घेईल. प्रशिक्षण आनंददायी होणार नाही. आज मी सूर्यनमस्कार घातले. काहीही त्रास झालेला नाही. म्हणजे मी घातलेले सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने घातलेले आहेत हा ठाम विश्वास ठेवा. सूर्यनमस्कार कौशल्य अधिक प्रमाणात मिळविण्याचा प्रयत्न करा. अधिक सूर्यनमस्कार घालण्याचा हळू हळू प्रयत्न करा. अधिकस्य अधिकं फलम्। सूर्यनमस्कार घालतांना श्लोक व मंत्र यांचा वापर करतात. सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार एक साधना २६०