पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिरवी भाजी. इत्यादी क्रिया व त्यासाठी लागणारे उष्मांक - फोन घेणे. खाणे, गाडी चालविणे, टंकलेखन, शिवणकाम, गाणे - प्रत्येक मिनिटाला ०.८५ उष्मांक खर्च होतात. वाचन करणे, पत्ते खेळणे- प्रत्येक मिनिटाला ०.४१ उष्मांक खर्च होतात. जिना चढणे प्रत्येक मिनिटाला ४१.६० उष्मांक खर्च होतात. माझा स्वतःचा निष्कर्ष १०० ग्रॅम ६०/७० उष्मांक मिळतात. जलद गतीने धावणे- प्रत्येक मिनिटाला १५ उष्मांक खर्च होतात. - - - सूर्यनमस्काराचा प्रत्यक्ष सराव सातत्याने दररोज चालू ठेवण्यासाठी त्याचा स्वीकार ब्रह्मकर्म म्हणून करा. नित्यकर्म म्हणून त्याची साधना करा. नित्य साधनेतून तुम्हाला अपेक्षित असलेले सर्व फायदे कायम स्वरुपी मिळतात. या सततच्या कर्मयोगातून आपली साधनेत प्रगती होते. त्याची रोकडा प्रचिती आपल्याला दररोज मिळते. साधनेमध्ये न कळत भक्ती योग सुरू होतो. या भक्तीतूनच ज्ञानाचा / ज्ञानयोगाचा अनुभव येतो. तुम्ही आता जे वाचता आहात ती माहिती झाली. प्रत्यक्ष शरीर अनुभूती हे सत्यज्ञान असते. हे शाश्वतसत्य द्वंद्वातीत आणि विश्वमान्य असते. हे ज्ञान मिळविण्यासाठी साधना / अभ्यास करणे याला पर्याय नाही. प्रत्यक्ष अनुभूतीतून आपले अज्ञान आपणच दूर करू शकतो. आत्म तेज वाढवू शकतो. नही ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।। भ.गीता-०४/३८ ज्ञानं लब्ध्वा परांशान्तिमचिरेणाधिगच्छति ।। भ.गीता-०४/३९ सत्यं ज्ञानं अनंत ब्रह्म । तैतिरीय उपनषिद प्रज्ञानं ब्रह्म ।। एतरेय उपनिषद प्रश्न- अ) सूर्यनमस्कार घालण्याच्या अनेक पद्धती आहेत. तसेच सूर्यनमस्कार घालतांना मंत्र व ते उच्चारणाची पद्धतही एकसारखी नाही. या सर्वांमधून एकच योग्य पद्धत व योग्य मंत्र निवडावयाचा झाल्यास कोणता निवडावा, त्याचा सूर्यनमस्कार एक साधना २५९