पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उष्मांक वापरले जातात. एकशेआठ सूर्यनमस्कार पंचवीस मिनिटांमध्ये घातल्यास २८१ किलोउष्मांक वापरले जातात. ... सर्व सहभागी सैनिक विद्यार्थ्यांनी सरासरी तीन मिनिटे चाळीस सेकंद सूर्यनमस्कार घातले. यामध्ये एकूण १३.९१ किलो उष्मांकाचा वापर झाला. म्हणजेच मिनिटाला ३.७९ किलो उष्मांकाचा वापर सूर्यनमस्कार घालतांना करण्यात आला. एक सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने घातल्यास साधारणपणे २.३० किलो उष्मांकाचा वापर केला जातो. ( शरीरशुद्धीत प्रथम स्नायूंची लवचिकता वाढते. यासाठी उष्मांकाचा वापर अधिक प्रमाणात होतो. दररोजच्या सरावातून सूर्यनमस्कारातील कौशल्य प्राप्त झाल्यावर उष्मांकाचा वापर थोडा घटतो.) बैठे काम करणारे, बुद्धीजीवी दिनचर्या असणारे साधारणपणे दोनहजार उष्मांक आपल्या आहारातून घेतात. काबाडकष्ट करणारे, मेहनतीचे कामकरणारे साधारणपणे चारहजार उष्मांक आपल्या आहारातून घेतात. शरीराचे वजन एक किलो कमी करावयाचे झाल्यास आहातातील उष्मांक ७००० कमी करावे लागतील. म्हणजेच दररोज ५०० उष्मांक आहार कमी केल्यास पंधरा दिवसात एक किलो वजन कमी होऊ शकते. अर्थात उपाशी राहून वजन कमी करण्यापेक्षा उष्मांकाचा वापर करून वजन नियंत्रणात ठेवणे अधिक चांगले. आहारातील जादा उष्मांक मात्र हळू हळू कमी करावयास हवेत. आपल्या दररोजच्या आहारातील उष्मांक मोजावयाचे झाल्यास खाली दिलेली सर्वसाधारण माहिती उपयोगी पडेल. अर्थात उष्मांक व अन्न यांच्या आहारी न जाता त्याचा तारतम्याने वापर करणे अधिक श्रेयस्कर आहे. दररोजचा आहार व त्यामधील उष्मांक द्विदल धान्य, गहू, बाजरी, तांदूळ तेल, तूप चरबी इत्यादी सूर्यनमस्कार एक साधना १ ग्रॅम ०४ उष्मांक मिळतात. १ ग्रॅम ०४ उष्मांक मिळतात. १ ग्रॅम ०९ उष्मांक मिळतात. २५८