पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शरीर शुद्ध झाले म्हणजे शरीरातील सर्व दोष-विकार दूर होतात. यानंतर शरीराची वृद्धी सुरू होते. शरीराची वाढ सुरू होते. पोट साफ असल्यास चांगली भूक लागते. आहाराचे प्रमाण वाढते. खाल्लेल्या अन्नाचे सहज पचन होते. अन्न अंगी लागते. शांत झोप लागते. शरीर-मनाला विश्रांती मिळते. तब्बेत सुधारते. शरीरात साठलेला अनावश्यक कचरा वेळो वेळी योग्य प्रमाणात बाहेर टाकला गेला नाही तर तो पुन्हा शरीरात शोषला जातो. जे घटक शरीरला उपयुक्त नाहीत ते सर्व अपायकारक असतातच. हे विष / विषाणू शरीरामध्ये पुन्हा शोषले जातात. यामुळे सर्वप्रकारचे आजार शरीरात कायम स्वरुपी ठाण मांडून बसतात. नियंत्रित सूर्यनमस्कार शरीराला हा कचरा बाहेर काढण्याची सवय लावतात. मदत करतात. शरीर ज्या प्रमाणात शुद्ध होते त्या प्रमाणात शरीराचे पोषण- संवर्धन वाढते. रोग प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते. शरीर-मनाचे आरोग्य सुधारते. आयुर्वेद शास्त्रामध्ये व्याधी निवारण्यासाठी औषधाला योग्य आहाराची जोड दिली जाते. त्याच प्रमाणे सूर्यनमस्कार साधना अखंडितपणे नित्यनेमाने करण्यासाठी त्यास प्राणायामाचा आधार देणे आवश्यक आहे. प्राणायाम केल्याने रक्ताभिसरणाची क्रिया प्रभाविपणे होते. शुद्ध रक्ताचा पुरवठा कानाकोपऱ्यातील सर्वस्नायूंना भरपूर प्रमाणात मिळतो. स्नायूंची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. सूर्यनमस्कार घालतांना स्नायुंना झालेले श्रम आणि त्यांना मिळणारा प्राणतत्त्वाचा खुराक यांचे संतुलन प्राणायामातून राखले जाते. हे संतुलन बिघडल्यास स्नायुंचे दुखणे सुरू होते. त्यांना प्राणतत्त्वाचा आहार प्राणायामातून अधिक प्रमाणात पुरविल्यास त्यांचे कार्य जोमाने सुरू होते. शरीर-मनाचे आरोग्य सुधारते. सूर्यनमस्कार-प्राणायाम आणि औषध- आहार ही जोडगोळी सर्वांगीण आरोग्य प्रदान करणारी आहे हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत कायमचा लक्षात राहण्यासाठी थोडी आकडेमोड करून गणित सोडविण्याचा प्रयत्न करू. खाली दिलेली माहिती कृतीसंशोधन / साधकांचे प्रत्यक्ष अनुभव / किंवा शास्त्रमान्य अशी आहे. दहा किलोमिटर वेगाने तीस मिनिटात पाच मैल धावल्यास २३८ किलो सूर्यनमस्कार एक साधना २५७