पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असतो. सूर्यनमस्कारामध्ये तुम्ही उपयोगात आणलेली शारीरिक शक्ती व मानसिक सामर्थ्य यांचाही सहभाग यामध्ये मोठा आहे. त्यामुळे हे कालावधीचे गणित सोडवणे सोपे नाही. पण हे गणित सोडविण्याची अंतर्गत प्रक्रिया सूर्यनमस्कार साधनेच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेली असते. यामध्ये होत असलेली प्रगती योग्य आहे याची प्रचिती दररोज साधकाला मिळत असते. सूर्यनमस्कारामध्ये ९५% पेक्षा अधिक स्नायूंचा वापर करण्याचे कौशल्य प्राप्त होणे म्हणजे प्रत्येक आसनातील आदर्श शरीर स्थिती सिद्ध झाली असे म्हणण्यास हरकत नाही. ही प्रगती होत असतांनाच संथगतीने घातलेले सूर्यनमस्कार हळू हळू शरीर शुद्धी करत असतात. श्वासाच्या तालावर सूर्यनमस्कारातील आसने लयबद्ध झाल्यावर शरीरवृद्धीस सुरुवात होते. तुम्हाला अपेक्षित सर्व सुखद परिणामांची अनुभूती मिळते. शारीरिक विकाराने प्राथमिक स्वरूप ओलांडले असल्यास सूर्यनमस्कार साधनेबरोबर औषधे व आहार (खाण्याच्या सवयी) याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. या तिघांची युती झाल्यास व्याधी विकारातून कमी कालावधित व कायमची मुक्तता होते. साधनेच्या सुरूवातीच्या काळामध्ये फक्त १२+०१ सूर्यनमस्कार घालायचे आहेत. (संदर्भ घ्या- कार्यपुस्तिका, ब्रह्मकर्मांतर्गत नित्यकर्म दैनिक सूचना ) त्यातील तीन सूर्यनमस्कार शांतपणे, सावकाश, समजून-उमजून घालणार आहोत. एक सूर्यनमस्कार घालण्यासाठी साधारणपणे पाच मिनिटे लागतील याकडे लक्ष द्यायचे आहे. या प्रकारातून शरीरातील विजातीय द्रव्यांचा साठा (Toxins), तसेच मेदवृद्धी कमी होण्यास सुरुवात होते. स्नायूंची लवचिकता वाढते, शरीराचे वजन कमी होण्यास सुरूवात होते. सर्वप्रकारे शरीराचे शुद्धीकरणास सुरूवात होते. उरलेले नऊ सूर्यनमस्कार आपण सहजपणे, वेगाने, सर्व व्यवधान ठेऊन घालणार आहोत. श्वासाच्या तालावर सूर्यनमस्काराच्या क्रिया लयबद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. वेळ किंवा इतर सूचनांचे पालन करणे या ठिकाणी अपेक्षित नाही. मात्र पार्श्वभाग मोकळा व श्वसनावर लक्ष या दोन सूचना मुद्दाम पाळणे गरजेचे आहे. गतीयुक्त सूर्यनमस्कारातून शरीरवृद्धी होते. सूर्यनमस्कार एक साधना २५६