पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनेक व्याधी सुरू होतात. सूर्यनमस्कार साधना नित्यनेमाने केल्यास शरीराचे वजन नक्कीच कमी करता येईल. साधनेची तीन वैशिष्ट्ये आहेत श्रद्धा-सातत्य - सबुरी. परिणामांसाठी अधीर न होता सूर्यनमस्कार साधनेचे हे व्रत श्रद्धेने अखंडितपणे चालू ठेवले पाहिजे. स्नायुंचे कोणत्याही प्रकारे दुखणे सुरू न होता सूर्यनमस्कार साधना दररोज सुरू ठेवणे हे आपले दैनंदिन उद्दिष्ट आहे. करन्यासाची कृती करतांना आपण पेशींच्या केंद्रबिंदुपर्यंत ताण - दाब पोहचविण्याचा प्रयत्न केला. तन, मन आणि श्वसन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे शक्य झालेले आहे. सूर्यनमस्कारामध्ये शरीराची ओढाताण न करता हळू हळू ९५% पेक्षा अधिक स्नायूंना कार्यरत करायचे आहे. प्रत्येक स्नायू केंद्राची स्फुरण पावण्याची क्षमता प्राणतत्त्वाच्या अधिक्याने प्रभावित करावयाची आहे. या पद्धतीने कार्यरत झालेले स्नायू पुढे दिवसभर याच जोमाने काम करतात. त्यांचे आकुंचन - प्रसरण पावण्याची क्रिया दमदार पणे सुरू राहते. हे कार्य करण्यासाठी लागणारी ऊर्जा शरीरातील उष्मांक वापरून मिळविली जाते. पोट-कंबर-ओटीपोट या स्नायुंचा मेद कमी करण्यासाठी चुंबक पट्टा किंवा विजेवर चालणारा पट्टा वापरण्यास देतात. या पट्टयाचा उपयोगही स्नायुंचे स्पंदन वाढविणे हाच असतो. हा प्रयत्न बाहेरून केला जातो. पट्टा काही तासच लावता येतो तो काढला की स्नायू पुन्हा मूळपदावर येतात. सूर्यनमस्कारामध्ये हेच कार्य, दीर्घ श्वसनाचे सहकार्य घेऊन, सातत्याने चोवीस तास प्रभावीपणे चालू ठेवता येते. सूर्यनमस्कारामध्ये ९५% पेक्षा अधिक स्नायूंचा वापर करण्याचे कौशल्य प्राप्त होण्यासाठी किती कालावधी लागेल हे नक्की सांगता येत नाही. तुमचा स्वभाव, आहार, दिनचर्या, वयोगट, वजन, उंची, बॉडीमास, व्यवसाय, शरीराची ठेवण, अयोग्य सवयी, व्याधी, अनुवंशिक विकार, आर्थिक स्थैर्य, सामाजिक/ कौटुंबिक सुरक्षितता इत्यादी घटकांचा प्रभाव सूर्यनमस्कार कौशल्यावर होत सूर्यनमस्कार एक साधना २५५