पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रत्येकाने घालावे हा संदेश यातून आपल्याला मिळतो. आज मी सूर्यनमस्काराचे अर्धे आवर्तन पूर्ण केले असे आपण म्हणत नाही. त्या ऐवजी आज मी बारा सूर्यनमस्कार घातले असे म्हणतो. यामध्ये समर्पणाचा +१ सूर्यनमस्कार मोजलेला नसतो. आवर्तन अर्धे कधी नसतेच. आवर्तन या शब्दामध्ये गती अभिप्रेत आहे. एका बिंदुपासून मंडलाला सुरूवात करून पुन्हा प्रारंभ बिंदुपर्यत येणे म्हणजे एक आवर्तन. क) समंत्रक सूर्यनमस्कार घालण्याची वेगळी पद्धत नाही. फक्त ते घालतांना काया-वाचा-मनोभाव यांचे अधिक सहकार्य घेण्याचा प्रयत्न केला जातो. हे सूर्यनमस्कार घालतांना बारा सूर्यमंत्रांचा उपयोग केला जातो. म्हणून समंत्रक सूर्यनमस्कार घालतांना १२+१ असा एक टप्पा असतो. मंत्रयुक्त सूर्यनमस्कार या विषयाची चर्चा स्वतंत्रपणे केलेली आहे. अधिक माहितीसाठी उत्तरार्ध- समंत्रक सूर्यनमस्कार हा भाग वाचा. प्रश्न- अ) सूर्यनमस्कार दररोज घातल्यामुळे सर्व रोग बरे होतात हा माझा दृढ विश्वास आहे. माझे वजन ७२ किलो आहे मला ते साधारणपणे ५४ किलोपर्यंत कमी करावयाचे आहे. मी दररोज किती सूर्यनमस्कार घालणे आवश्यक आहे ? किती दिवसांनी /महिन्यांनी माझे हे स्वप्न साकार होईल याचा अंदाज बांधता येईल कां? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. शंका समाधान सूर्यनमस्कार साधनेस सुरूवात करण्यासाठी काहीतरी निमित्त लागते. अकाल मृत्यूहरणं सर्वव्याधी विनाशम् हे त्याचे स्वरूप आहे. त्यामुळे सूर्यनमस्कारातून सर्वरोग दूर ठेवता येतात. प्राथमिक स्वरुपात असल्यास त्याचा उपचारात्मक वापर करता येतो. मांडीचा खुबा व गुडघे हे शरीराचे वजन वाहणारे, शरीराची हालचाल करणारे प्रमुख सांधे आहेत. शरीराचे वजन वाढल्यास शरीराचे आकारमान वाढते. रक्ताभिसरण क्षेत्रातही वाढ होते. त्यामुळे रक्ताभिसरण क्षीण होते. स्नायुंची ताकद कमी झाल्याने शरीराचे चलनवलन कष्टदायक होते. त्यातून सूर्यनमस्कार एक साधना २५४