पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सांख्य व वेदांत तत्त्वज्ञानाप्रमाणे २४+१ या संख्येचे महत्त्व म्हणजे- पाच मूलतत्त्वे, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच तन्मात्रा, मन, बुद्धी, अहंकार, प्रज्ञा + परमतत्व. शरीराची ही चोवीस मूलतत्त्वे + आत्माराम (सदगुरू) मिळून सूर्यनमस्काराचे एक आवर्तन होते. प्रत्येक महिन्याला सूर्य पुढील राशीमध्ये प्रवेश करतो ते बारा आदित्य आहेत. वर्षाचे बारा महिने आहेत. एका वर्षामध्ये सूर्यराशी बारा आहेत. व्रत चार मासांचे म्हणजे ३० x ४ = १२० दिवसांचे असते. ( १२ x १० ) एक तप बारा वर्षांचे असते. म्हणजे तपाचे दिवसही बाराचे पटीतच असतात. सूर्योदयापासून सूर्यास्त व पुन्हा सूर्योदय यामध्ये प्रत्येकी बारा तास बारा सूर्यमंत्र + परमतत्व. सर्व समर्थभक्त व सूर्यनमस्कार साधक बारा+एक हा अंक शुभ मानतात. सद्गुरू समर्थ रामदास स्वामी बारा वर्षाचे असतांना आगर टाकळी नासिक येथे आले. तेथे बारा वर्षे सूर्योपासनेचे व्रत केले. पुढे बारा वर्षे भारत भ्रमण करून बाराशे पेक्षा अधिक मठांची स्थापना केली. सूर्योपासना मारुती उपासनेच्या माध्यमातून समाजाचे आत्मतेज जागृत केले. रामराज्याची प्रतिष्ठापना प्रत्येक दासाच्या अंतःकरणात केली. पुढील सर्व आयुष्य अध्यात्म व व्यवहार यांची सांगड घालत संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. येतात. ही यादी आणखी वाढविता येईल. बाराचे दोन गट + एक समर्पणाचा सूर्यनमस्कार असे पंचवीस सूर्यनमस्कार म्हणजे सूर्यनमस्काराचे एक आवर्तन होते. सूर्यनमस्काराचे किमान एक आवर्तन म्हणजे पंचवीस सूर्यनमस्कार दररोज सूर्यनमस्कार एक साधना २५३