पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नमस्कारासन, भुजंगासन, पर्वतासन यामध्ये दोनदा येणारी आसने आहेत प्रणामासन, अश्वसंचालनासन आणि हस्तपादासन सूर्यनमस्काराची बारावी स्थिती आहे प्रणामासन + नमस्कार मुद्रा. . बारावी स्थिती दोन भागात विभागता येते प्रणामासन आणि नमस्कार मुद्रा प्रणामासन हे सूर्यनमस्काराचे शेवटचे आसन व नमस्कार मुद्रा ही पुढ सूर्यनमस्काराची सूरूवात असते. यामध्येही एक सूर्यनमस्कार पूर्ण झाला तो समर्पित करण्याचा भाव व पुढील सूर्यनमस्कार सुरू करण्यासाठी वंदन भाव असे आदि - अंत भाव आहेत. आसन म्हणजे स्थिरसुखमासनम् । यामध्ये शरीरातील ठराविक अवयवांवर शांतपणे सहज शक्य होईल तेवढा ताण किंवा दाब देऊन त्या स्नायूंची लवचिकता वाढविणे हा एक प्रमुख उद्देश असतो. आसन आणि मुद्रा या प्रकारांची तुलना केल्यास मुद्रेमध्ये ताण किंवा दाब दिला जात नाही. आसन ही शरीरस्थिती आहे असे मानले तर मुद्रा ही मानसिक स्थिती आहे, भावमुद्रा आहे असे म्हणता येईल. एक स्नायूंची शक्ती वाढविणारी आहे दुसरी मनःसामर्थ्य प्रदान करणारी आहे. सूर्यनमस्काराचे एक आवर्तन एक सूर्यनमस्कार म्हणजे बारा सूर्यमंत्र, बारा आसने. असे बारा + बारा + एक म्हणजे पंचवीस सूर्यनमस्कार पूर्ण केले म्हणजे एक- सूर्यनमस्काराचे आवर्तन होते(१२+१२+१). २४+०१ समंत्रक सूर्यनमस्कार म्हणजे एक आवर्तन असे हे मोजमाप आहे. सूर्योपासनेमध्ये या चोवीस + एक या संख्येला महत्व आहे. गायत्रीमंत्रामध्ये चोवीस अक्षरे आहेत. गायत्रीमंत्रामधील प्रत्येक उच्चार शरीरावरील चोवीस न्यासकेंद्रांवर प्रभाव टाकतात. त्यांना कार्यरत करतात. दिवसाचे तास चोवीस असतात. रात्र बारा तास + दिवस बारा तास. सूर्यनमस्कार एक साधना २५२