पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोणती पद्धत वापरतात ? शंका समाधान अ आणि ब या दोन्ही प्रश्नांची उत्तरे एकदमच देण्याचा प्रयत्न करतो. कारण एक-सूर्यनमस्कार व एक- सूर्यनमस्कार - आवर्तन या दोन्ही संकल्पना स्वतंत्र नाहीत. त्या एकमेकांवर अवलंबून आहेत. एका सूर्यनमस्कारामध्ये कोणत्या क्रिया अंतर्भूत होतात हे समजले की आवर्तन ही संकल्पना स्पष्ट करण्याची गरज नाही. एका सूर्यनमस्कारामध्ये बारा शरीर स्थिती आहेत. किंवा असेही म्हणता येईल की बारा शरीर स्थितीचा एक सूर्यनमस्कार असतो. एका सूर्यनमस्कार आवर्तनात अनेक सूर्यनमस्कार येतात. आवर्तन हे सूर्यनमस्कार मोजण्याचे प्रमाण आहे. ते कसे हे आपण पुढे पाहू. अर्थात हे मोजण्याचे माप प्रमाणित आहे. सर्वमान्य आहे. पण त्या मापट्याचे आकार मात्र वेगवेगळे आहेत. बारा सूर्यमंत्र व बारा कृती हे मूळ माप किंवा प्रमाणित माप झाले. या मापाचे आकारमान तेच राहते मात्र आकार बदलतांना दिसतात. एक अंकी ते सोळा अंकी सूर्यनमस्कार हे मला माहीत असलेले प्रकार आहेत. यातही आसनांची संख्या प्रत्येक सांप्रदायागणिक बदलत असते. आसनाची द्विरुक्ती यामध्येही फरक असतो. आसनांतील कोणते कौशल्य अपेक्षित आहे हे दर्शविण्यासाठी त्यांच्या नावातही विविधता दिसून येते. प्रत्येक साधकाला आलेले अनुभवसुद्धा वैचित्र्यपूर्ण असतात. म्हणूनच सूर्यनमस्कार ही संकल्पना व्यक्तीपरत्वे सुद्धा बदलणारी आहे. वेगवेगळ्या कालखंडातही त्यामध्ये बदल झालेले आहेत. सूर्यनमस्कारातील विविधता हाच या साधनेचा आत्मा आहे. म्हणूनच ही साधना कालातीत आहे असे म्हणता येईल. आपण मात्र सोईसाठी बारा सूर्यमंत्र, बारा आसने या प्रकाराचाच फक्त विचार करणार आहोत. एक-सूर्यनमस्कार एका सूर्यनमस्कारामध्ये बारा शरीरस्थिती तसेच बारा सूर्यमंत्र आहेत. सूर्यनमस्काराला आसनांचा मुकुटमणी असेही म्हणतात. कारण एका सूर्यनमस्कारा- मध्ये आपण प्रत्येक वेळी आठ आसने करतो. त्यांची नावे आहेत- प्रणामासन, ऊर्ध्वहस्तासन, हस्तपादासन, अश्वसंचालनासन, मकरासन, साष्टांग • सूर्यनमस्कार एक साधना २५१