पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क - उत्तम साधक म्हणून देता येईल. अ गटातील स्पर्धकांचा नावानिशी उल्लेख करून त्यांचे विशिष्ट अनुभव प्रसिद्ध करावेत. उपक्रमाची सांगता सर्व केंद्रावर एकाच वेळी / एकाच ठिकाणी सांघिक सूर्यनमस्कार घालून करावी. हा कार्यक्रम (शक्यतो) रथसप्तमीला घ्यावा. उपक्रम कालावधीत सर्व विद्यार्थ्यांनी काढलेले एकूण सूर्यनमस्कार व त्यांनी नोंदवलेले अनुभव संकलीत करावेंत. नियोजन भाग चार- सूर्यनमस्कार स्पर्धा / यज्ञ उद्दिष्टः स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सूर्यनमस्कार साधकाला सूर्यनमस्कार सराव सातत्य कायम टिकून राहण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देणे. सूर्यनमस्कार साधनेतून शरीर-मन-बुद्धी या स्तरांवर होणाऱ्या बदलांची नोंद ठेवणे. आलेले अहवाल सूचना किंवा शंका यांचे विश्लेषण करणे. सर्व अहवाल संकलित करून संक्षिप्तपणे प्रसिद्ध करून इतरांना सूर्यनमस्कार घालण्यास प्रवृत्त करणे. त्यांना मार्गदर्शन करणे. संकलित झालेली माहिती सूर्यनमस्कार संशोधन / अभ्यास करणाऱ्यास उपलब्ध करून देणे. प्रश्न अ) सूर्यनमस्काराचे एक आवर्तन किती सूर्यनमस्कारांचे असते? किंवा एका सूर्यनमस्कारामध्ये किती आवर्तने होतात? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. - ब) सूर्यनमस्कार मोजतांना कसे मोजतात ? एक सूर्यनमस्कार म्हणजे बारा आवर्तन असे मोजतात काय? क) समंत्रक सूर्यनमस्कार घालण्याची पद्धत वेगळी आहे का ? ते मोजतांना सूर्यनमस्कार एक साधना २५०