पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या चारही गटातील सर्वसाधारण व वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय संकलीत करायचे आहेत. अहवाल परीक्षण / स्पर्धा पारितोषिक गुणदान निश्चित करण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत. सामुहिक सूर्यनमस्कार उपस्थिती. दररोजच्या सरावातील सातत्य. सादर केलेल्या अहवालांची संख्या. अहवालात नोंदवलेले अनुभव ( अनुभवांची प्रतवारी करून गुणदानाचे प्रमाण कमी जास्त ठेवावे. ) सूर्यनमस्कारामुळे काही त्रास झाल्यास मार्गदर्शन घेऊन तो दूर केला. सूर्यनमस्कारात खंड पडू दिला नाही. ( गुणदानाचे प्रमाण जादा ठेवावे. ) स्पर्धकाचे वागणे, बोलणे, काम करण्याची पद्धत, मदतीसाठी तत्पर, नेतृत्व गुण, सूर्यनमस्कार साधनेवरील श्रद्धा यांचा विचार करावा. सूर्यनमस्कार संख्येमध्ये झालेली वाढ. नवीन साधकाकडून शेवटच्या आठवड्यात ६० ते ७५ सूर्यनमस्कार अपेक्षित आहेत. (पूर्वीपासून प्राणायाम सूर्यनमस्कार साधना करणारे यांचे वय, साधनेतील अनुभव, प्रकृती, व्यवसाय इत्यादी लक्षात घेऊन सूर्यनमस्काराची मर्यादा ठरवावी.) सूर्यनमस्कार घालण्यामधील लय व ताल. समंत्रक सूर्यनमस्कार. कोणते मंत्र मंत्रोच्चार पद्धती. आसनामध्ये काही चुका होत असल्यास त्या त्या वेळी त्या स्पर्धकाला सांगाव्यात. योग्य पद्धत सांगतांना ती सकारण सांगावी. या चुकांसाठी स्पर्धकाचे गुण कमी केलेले नाहीत. तसेच आज नाही उद्या ही चूक स्वयंसाधनेतून दुरूस्त होणार आहे. हेही त्यास सांगावे. चूक लगेच दुरूस्त करण्याचा आग्रह धरू नये. प्रत्येक मुद्याला गुणदान देतांना अ-ब - क या श्रेणीमध्ये द्यावे. या तीन श्रेणींना नाव द्यायचे झाल्यास अ- उत्तम संघटक शिक्षक, ब- उत्तम मार्गदर्शक, सूर्यनमस्कार एक साधना २४९