पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साप्ताहिक सूर्यनमस्कार सरावामध्ये प्रत्येक शुक्ल आष्टमीला फक्त तीन सूर्यनमस्काराची वाढ करावी. प्रत्येक संस्थेमधील स्पर्धकांची संख्या लक्षात घेऊन त्यांचे उरलेले चार दिवसांचे सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग आयोजित करावेत. संपूर्ण कालावधीमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे नोंदणी फॉर्म भरून घ्यावेत. प्रत्येक स्पर्धकाने सकाळी आंघोळ झाल्यानंतर स्वतंत्रपणे सूर्यनमस्काराचा दररोजचा सराव न चुकता करावयाचा आहे. स्पर्धकाने ठरवून दिलेल्या दिवशी आपला सूर्यनमस्कार दैनंदिन नोंद तक्ता (दीर्घश्वसन / पूरक व्यायाम / सूर्यनमस्कार केंव्हा, कितीवेळ / संख्या, आलेला अनुभव अडचणी शंका या सर्वांची नोंद.) गटप्रमुखाकडे द्यावयाचा आहे. गटप्रमुखांनी सर्वअहवाल गोळाकरून केन्द्र प्रमुखांकडे जमा करावयाचे आहेत. केन्द्र प्रमुखांनी सर्व अहवालांची वर्गवारी स्त्री-पुरूष, वयोगट याप्रमाणे करावयाची आहे. आठवड्यातून एकदा गटातील / केंद्रातील सर्वांनी सामुहिक सूर्यनमस्कार घालावयाचे आहेत. मार्गदर्शक / शिक्षकांनी स्पर्धकांच्या काही अडचणी असल्यास त्यांना मार्गदर्शन करायचे आहे. त्याची नोंद ठेवायची आहे. नियोजन भाग तीन- अहवाल नोंद- केन्द्र प्रमुखाने प्रत्येक गटातील (स्त्री-पुरूष, वयोगट) स्पर्धकांनी सादर केलेल्या सर्व दैनंदिन नोंद तक्त्यांची नोंद करायची आहे. त्यांचे परीक्षण करून विद्यार्थ्याने / स्पर्धकाने किती सूर्यनमस्कार घातले, त्याला आलेले अनुकूल अनुभव, प्रतिकूल अनुभव, सूचना अशा चार गटात त्यांची नोंद करायची आहे. सूर्यनमस्कार एक साधना २४८