पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बौद्धिक, वर्तन-सवयी याबाबतचे स्वतःला आलेले अनुभव. २) इतरांनी तुमचे दिसणे, वागणे, काम करण्याची पद्धत, हुषारी याबद्दल दिलेली शाबासकी. ३) या व्यतिरिक्त दिवसभरात आलेले इतर चांगले वाईट अनुभव. स्पर्धा संयोजक, मार्गदर्शक, शिक्षक यांच्या संपर्कात रहा. त्यांचा दूरध्वनी, पत्ता लिहून ठेवा. सूर्यनमस्कार दैनिक नोंद तक्ता लिहितांना तिथीचा वापर करा. तिथी चंद्रकलेवर आधारलेल्या आहेत. चंद्र हा आपल्याला सर्वात जवळ असणारा ग्रह आहे. पौर्णिमा आमावस्येला समुद्राला भरती ओहोटी येते. त्याचप्रमाणे आपल्या मन-शरीरावरही चंद्राचा प्रभाव पडतो. शुक्ल पक्षातील किंवा कृष्ण पक्षातील एखाद्या तिथीला चंद्राचा आपल्यावर असणारा प्रभाव त्या प्रत्येक तिथीला त्याच प्रकारचा असतो. त्याची तीव्रता कमी जास्त होईल येवढेच. या दृष्टीकोनातून नोंद तक्त्यामध्ये लिहिलेले अनुभव तपासले तर आपला शुभदिन कोणता हे नक्कीच समजून येईल. तिथीचा वापर करण्यामध्ये इतरही अनेक फायदे आहेत. हे सर्व फायदे हळू हळू तुमच्या लक्षात येतीलच. तिथी - वार यामध्ये व्यक्ती आणि निसर्गचक्र यांची सांगड घातलेली आहे. इंग्रजी तारखेमध्ये मात्र घटना आणि दिवस याचे गणित आहे. - नियोजन भाग दोन कार्यवाही - सर्व संघटक, मार्गदर्शक, शिक्षक, गटप्रमुख यांचे सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण प्रथम पूर्ण करावे. सहभागी झालेल्या संस्थांमधील सर्व स्पर्धकाना एकत्र करून त्यांना सूर्यनमस्कार साधनेची माहिती सांगावी. प्रात्यक्षिकाची थोडी तयारी करून घ्यावी. सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्गाचा हा पहिला दिवस असेल. (संदर्भ- या पुस्तकातील पूर्वार्ध बघा.) या कार्यक्रमाच्या शेवटी साप्ताहिक सामूहिक सूर्यनमस्काराचा दिवस जाहीर करावा. त्याबद्दलच्या सूचना द्याव्यात. त्याचे नियोजन करावे. सूर्यनमस्कार एक साधना २४७