पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इतर सर्व साधक / स्पर्धक / विद्यार्थी यांची संख्या विचारात घेऊन प्रशिक्षण वर्गांचे नियोजन करावे. एका आठवड्यामध्ये दोन सरावसत्र घेऊन सर्वांचे सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण साधारणपणे एका महिन्यामध्ये पूर्ण करणे. या उपक्रमाचा कालावधी निश्चित करणे, ( प्रशिक्षण कालावधी सोडून हा कालावधी किमान १८० दिवसांचा असावा.) स्पर्धा नियम (स्पर्धा नियम सर्व सहभागी साधकांपर्यंत पोहचवणे.) दररोज अंघोळ झाल्यानंतर सूर्यनमस्कार घाला. साप्ताहिक सूर्यनमस्कार प्राणायाम सामुदायिक सराव सत्राला नियमितपणे उपस्थित रहा. सूर्यनमस्कार किती घातले याला महत्त्व नाही. स्नायूंचे कोणतेही दुखणे सुरू न होता सूर्यनमस्कार दररोज घालणे हे प्रत्येकाचे दररोजचे उद्दिष्ट आहे हे लक्षात ठेवा. सूर्यनमस्कार दैनंदिन नोंद तक्त्यावर आपली संपूर्ण माहिती लिहा. नाव, संस्था, उद्योग, पत्ता, दूरध्वनी, वजन, उंची शेवटी तुमची स्वाक्षरी इत्यादी. (पालकांची स्वाक्षरी अज्ञान असल्यास) दैनंदिन नोंद तक्त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती दररोज लिहा. गटप्रमुखांनी ठरवून दिलेल्या दिवशी त्यांच्याकडे हा अहवाल नियमितपणे सादर करा. काही त्रास झाल्यास मिळालेले मार्गदर्शन, सुचविलेले उपाय, औषध, दुखणे किती दिवसात बरे झाले इत्यादी माहिती लिहा. सूर्यनमस्कार दैनंदिन साधना सुरू असतांना आलेले चांगले वाईट अनुभव थोडक्यात लिहा. या अनुभवामध्ये साधारणपणे तीन भाग पाडता येतील. १) शारीरिक, सूर्यनमस्कार एक साधना २४६