पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्पर्धा आयोजित करण्यामागील मूलभूत उद्देश सफल होत असतील तर सूर्यनमस्कार स्पर्धा एक 'सामाजिक वरदान' ठरते. त्यामूळे सूर्यनमस्कार साधकांना (विद्यार्थ्यांना) चांगले मार्गदर्शन मिळते व इतरांना सूर्यनमस्कार नित्यकर्म म्हणून स्वीकारण्यास प्रेरणा मिळते. सूर्यनमस्कार स्पर्धा खालील प्रकारे अयोजित केल्यास शक्तीउपासना व संघटन याची प्रचिती संयोजकांना व स्पर्धकांना दोघांनाही नक्की येईल अशी खात्री आहे. नियोजन भाग एक संस्था नोंदणी आपल्या विभागातील संस्थांशी संपर्क साधून सूर्यनमस्कार प्राणायाम स्पर्धा / यज्ञ या उपक्रमात सहभागी होणाऱ्या संस्थांची नोंदणी करणे. संस्थाप्रतिनिधींची प्रथम सभा बोलाविणे- - सहभागी संस्था प्रतिनिधींना सूर्यनमस्कार प्राणायाम स्पर्धा/यज्ञ या वार्षिक उपक्रमाची माहिती- कालावधी, उद्दिष्ट कार्यवाही व मूल्यमापन यांची माहिती देणे. सहभागी होणाऱ्या संस्थेमधील किती सभासद उपक्रमात सहभागी होणार आहेत याची नोंद घेणे. त्यांची वर्गवारी करणे. महिला-पुरूष, वयोगट, ज्येष्ठनागरिक, मुले-मुली इत्यादी. यामध्ये संघटक / मार्गदर्शक / कार्यकर्ता / शिक्षक / गटप्रमुख / स्वयंसेवक / साधक (विद्यार्थी) अशा वेगवेगळ्या याद्या तयार करणे. सहभाग संख्या अधिक असल्यास त्यांची विभागणी केंद्र १-२- अशी करणे. संघटक, मार्गदशर्क, शिक्षक इतर अधिकारी यांचेसाठी पाच दिवसांचे सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण सराव सत्र वर्गाचे नियोजन करणे. गटप्रमुख, कार्यकर्ता, स्वयंसेवक यांचेसाठी पाच दिवसांचे सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण सराव सत्र वर्गाचे नियोजन स्वतंत्रपणे करणे. सूर्यनमस्कार एक साधना २४५