पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचा आधार आहे. बलोपासना, मरूतउपासना याचे अधिष्ठान आहे. या साधनाचा प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केल्या जातात. हा उपक्रम स्पर्धकांना प्रेरणा देणारा आहे. समाजाला संजीवन देणारा आहे. देशाला गौरवास्पद आहे. एखादी स्पर्धा आयोजित करण्यामागील मूलभूत उद्देश सर्वसाधारणपणे तीन असतात. १) २) या विषयाची लोकजागृती करणे. विषय कौशल्ये आत्मसात करण्यासाठी स्पर्धकांना मार्गदर्शन करणे, प्रेक्षकांना उत्तेजन देणे. ३) ज्यांची या विषयातील प्रगती योग्य मार्गावर आहे त्यांची पाठ थोपटणे पारितोषिक देऊन सत्कार करणे. सूर्यनमस्कार कार्यकर्ता म्हणून त्याचा लौकिक वाढविणे. या उद्देशात स्थल-काल- संस्था परत्वे काही जादा उद्दिष्ट्ये समाविष्ट केलेली असतात. ते योग्यच आहे. पण ज्यावेळी मूळ उद्दिष्ट्ये वगळून इतरच उद्दिष्ट्ये साध्य होण्यासाठी स्पर्धा आयोजित केली जाते तेंव्हा ती स्पर्धा न राहता फक्त धावपळ होते- संयोजकांची आणि स्पर्धकांची सुद्धा. हे तीनही उद्देश लक्षात घेऊनही सर्वच विषयांची स्पर्धा घेता येईल असे नाही. 'लाडू खाण्याची' स्पर्धा शरीरास अपायकारक ठरणारच. 'आईवर माझे प्रेम' अशी स्पर्धा घेणे हास्यास्पद होईल. पण एवढेमात्र खरे की हे स्पर्धेचे युग आहे कोणतीही स्पर्धा घेतली तरी त्याला स्पर्धक हमखास मिळतातच. सूर्यनमस्कार ही साधना आहे. धार्मिक कृत्य आहे. ब्रह्मकर्मांतर्गत नित्यकर्म आहे. विशेष म्हणजे ही स्वयंसाधना आहे. सूर्यनमस्काराची ही सर्व विशेषणे लक्षात घेऊन स्पर्धेचे आयोजन केले पाहिजे. प्रत्येक साधना ही परमेश्वराची आराधना करण्याचे एक साधन असते. हे हत्यार हाताळणे, वापरणे, धार लावून चांगल्या स्थितीत ठेवणे, त्याची काळजी घेणे, गंज चढणार नाही याची दक्षता घेणे वगैरेची सर्व जबाबदारी साधनाचा वापर सूर्यनमस्कार एक साधना २४३