पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या विषयाला स्थान नसते. चुकून आलाच तर उत्साहाने खालील 'उद्बोधने' ऐकायला मिळतात. ‘शाळेत शिकत असतांना मी सूर्यनमस्कार घालत होतो. ‘शाखेमध्ये आम्ही दररोज सूर्यनमस्कार घालायचो. 'सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये मला बक्षिस मिळालेले आहे'. 'माझे आजोबा दररोज सूर्यनमस्कार घालत होते. हे सर्व भूतकाळातील अनुभव झाले. ऐतिहासिक बातमी झाली. 'समर्थ' भूतकाळ झाला. वर्तमान काळाबद्दल विचारले तर सूर निरूत्साहाचा. काय करणार पाठ दुखते, संधीवाताचा त्रास सुरू आहे सूर्यनमस्कार घालता येणार नाहीत. मधुमेह / हृदयरोग / पोटाचे विकार सुरू झालेत. डॉक्टर सूर्यनमस्काराला परवानगी देणार नाहीत. हे काय साधना करण्याचे वय आहे? अभ्यासाकडे, व्यवसायाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सूर्यनमस्कारासाठी वेळ कुठून आणू? वगैरे वगैरे.... आज जमाना आहे फास्टफुड- चिवडे, कुरकुरे, वेफर्स, सॉस, दोन मिनट, एक मिनट यांचा. यावर उतारा म्हणून ड्रिंकस्, कोल्ड ड्रिंकस्, आईस्क्रीम, चॉकलेट यांचा वापर सर्रास आहेच. एकाचा परिणाम भूक भागविण्यासाठी होत नाही तर भूक. 'भागो'. यासाठी होतो. दुसऱ्याचा परिणाम शरीराचा मेद व बुद्धीचा मंदपणा वाढविण्यासाठी होतो. यामुळे कुपोषण ते मेदवृद्धी या दोन अंतिम मर्यादांमधे असलेले सर्व रोग-व्याधी-विकार-व्यसन शरीरात ठाण मांडून बसतात. सुखेनैव राहतात. यथेच्छ आराम करतात. आळी पाळीने डोके वर काढतात. वाकुल्या दाखवून तुम्हीसुद्धा काम करायचे नाही असे फर्मान बजावतात. ऐकले नाही तर समन्स पुढे कायदेशीर कार्यवाही सुरू. न्यायदानाचा निकाल 'आरोपीला शिक्षा' एवढाच असतो. शिक्षा कोणती ते मात्र आजारी पडल्यानंतरच कळते. शिक्षेची कार्यवाही इतकी विविध प्रकारची असते की नेमके आजारपण शोधायला हजारो रूपयांचा खर्च होतो. रोगराई धार्जिणे साम्राज्य नष्ट करण्यासाठी, रामराज्याची स्थापना हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यासाठी सूर्योपासना/शक्तीउपासनेला पर्याय नाही. सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार एक साधना २४२