पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कपाळ टेकण्याऐवजी नाक टेकते. माझे नाक तसे फार मोठे नाही. या चुकीमुळे सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये गुण कमी मिळतील. म्हणून मुद्दाम हा प्रश्न विचारत आहे. कृपया मार्गदर्शन करावे. पुस्तकाचा दुसरा 'भाग साधकांसाठी कार्यपुस्तिका' यामध्ये साष्टांग नमस्कारासन करण्याची पद्धत सविस्तरपणे दिलेली आहे. तो भाग एकदा वाचा. त्याप्रमाणे हे आसन करण्याचा प्रयत्न करा. त्यातील काही महत्वाच्या प्रथम कौशल्याच्या सूचना खालील प्रमाणे- पोट, छाती जमिनीवर टेकवा. हाताचे पंजे खांद्याजवळ, कोपर शरीराजवळ ठेवा. हे आसन श्वास सोडून करायचे आहे. ओटीपोट रिकामे होईल याकडे लक्ष द्यायचे आहे. जालंधर बंध लावायचा आहे. म्हणजेच हनुवटी छातीला लावायची आहे. पोटाचे स्नायू पूर्णपणे मोकळे करायचे आहेत. पार्श्वभाग मोकळा करायचा आहे. आता संपूर्ण पोट पाठीकडे आत ओढायचे आहे. स्वधिष्ठान चक्राचे स्नायू/कंबर वर उचलून धरायची आहे. शरीराला मिळालेला ताण स्वीकारायचा आहे. ताण मोकळा करा. श्वास घेण्यास सुरूवात करा. सूर्यनमस्कार स्पर्धा आणि स्पर्धेतील गुणदान याबद्दल उपस्थित केलेली शंका माझे दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. या स्पर्धेकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन सविस्तरपणे पुढे देतो आहे. सूर्यनमस्कार स्पर्धांचे आयोजन - संयोजन करणारे संघटक, साधक तसेच स्पर्धक यांना हे विचार स्वीकारार्ह वाटतील अशी अपेक्षा आहे. सूर्यनमस्कार स्पर्धा चार जण एकत्र आले की गप्पाष्टक सुरू होतात. पण यामध्ये सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार एक साधना २४१