पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

किंवा पाठीचा मणका खाली वाकून ओढणे हा या आसनाचा उद्देश नाही. म्हणून कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न न करता कंबर वर उचलण्याचाच फक्त सराव करा. सूर्यनमस्काराच्या दीर्घ सरावातून कपाळाला गुडघे लागण्याची क्रिया आपोआप सिद्ध होणार आहे. ती तुम्हाला करता येणार आहे हे निश्चित समजा. अर्थात त्यालाही काही मर्यादा आहेत हे लक्षात ठेवा. २ १ सूर्यनमस्कारामध्ये ९५% अधिक स्नायू कार्यरत होणे जरुरीचे आहे. सरळ उभे राहून खाली वाकणे याकडे लक्ष दिले नाही तर हे आसन जमणार नाही. पार्श्वभाग मागे ढकलून खाली वाकले की कपाळ व गुडघा यामधील अंतर वाढणार. हे आसन नीट जमणार तर नाहीच पण गुडघ्यावर दाब येईल आणि तेथे त्रास सुरू होईल. ४ ६ शरीराचा बी. एम. एस २१ च्या आसपास असावा. शरीराची उंची कमी व वजन जास्त असल्यास या आसनामध्ये कपाळ गुडघ्याला लागणार नाही. धावपटू व जलतरणपटू यांच्या पायांची उंची शरीराच्या मानाने जास्त असते. त्यांना हे आसन या पद्धतीने करणे सहज शक्य होत नाही. किंवा त्यांना यासाठी अधिक दीर्घकाळ सराव करावा लागतो. सूर्यनमस्कार साधनेतून शरीराची ठेवण किंवा आकार बदलता येणार नाही. सशाची मांजर होणार नाही किंवा कुत्र्याची शेळी होणार नाही. ती अपेक्षा ठेऊन सूर्यनमस्काराचा सराव करणे अयोग्य होईल. तुमच्या घराण्यात शेटजीचा शरीर - आकार असलेले पूर्वज असतील आणि तो वारसा हक्क तुम्हाला मिळालेला असल्यास सूर्यनमस्कार साधनेमुळे हा आकार बदलता येणार नाही मात्र आकारमानामध्ये (साईझ) थोडाफार बदल निश्चित होइल. ( अधिक माहितीसाठी साधकांसाठी कार्यपुस्तिका वाचा.) ब) सूर्यनमस्कार सराव चालू आहे. साष्टांनमस्कारासन घालतांना जमिनीला सूर्यनमस्कार एक साधना २४०