पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काही चूक होते आहे काय ? ती कशी दूर करता येईल ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. ब) सूर्यनमस्कार सराव चालू आहे. साष्टांगनमस्कारासन घालतांना जमिनीला कपाळ टेकण्याऐवजी नाक टेकते. माझे नाक तसे फार मोठे नाही. या चुकीमुळे सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये गुण कमी मिळतील. म्हणून मुद्दाम हा प्रश्न विचारत आहे. कृपया मार्गदर्शन करावे. शंका समाधान- अ) ऊर्ध्वहस्तासनात श्वास घेत दोन्ही हात वर ताणून धरत संपूर्ण शरीराला ऊर्ध्वदिशेला ताण द्यायचा असतो. (नंतरची तिसरी शरीर स्थिती पादहस्तासन. ) हा ताण मोकळा न करता (किंवा तो पुन्हा प्रस्थापित करून) स्वाधिष्ठान चक्रावर मन एकाग्र करून, श्वास सोडण्याकडे लक्ष देत खाली वाकायचे. जेवढे शक्य होईल तेवढेच वाकायचे. (शरीराला जोर-जबरदस्ती; दाब - झटका द्यायचा नाही. ) नंतर स्वाधिष्ठान चक्र वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. हनुवटी छातीला लावायची. मान- खांदे - हात यांचे स्नायू मोकळे ठेवायचे. पार्श्वभाग मोकळा ठेवायचा. यामध्ये दोन पथ्ये पाळणे अत्यंत आवश्यक. एक सरळ उभे रहाणे, दुसरे स्वाधिष्ठान चक्राचे स्नायू वर उचलणे. दोन्ही पायावर शरीराचे वजन समप्रमाणात आहे याची खात्री करा. भिंतीला खेटून उभे रहा व हे आसन करा म्हणजे पाय व पार्श्वभाग सरळ स्थितीमध्ये येतील. त्यानंतर स्वाधिष्ठान चक्राचे स्नायू वर उचलण्याचा प्रयत्न करा. पोटातील स्नायुंना मसाज करणे हा या आसनाचा उद्देश आहे. खाली वाकलेल्या शरीराचा भाग मोकळा करून (मान, खांदे, हात यांचे स्नायू ढिले ठेऊन) कंबरेचे स्नायू उचलून धरले म्हणजे हे मसाज होते. हा दिलेला ताण पोटाच्या पाठीकडील बाजूस असलेल्या स्नायुंना आहे. (साष्टांगनमस्कारासनात तो पोटाच्या स्नायुंना असतो.) कपाळ गुडघ्याला लावून हस्तपादासन करता येणे म्हणजे आदर्श सूर्यनमस्कार घालता येणे ही संकल्पना आसनाच्या उद्देशा धरून नाही. कारण पोट दाबणे सूर्यनमस्कार एक साधना २३९