पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुरवठा यांचा मेळ बसत नाही. प्राणतत्त्वाचा खुराक स्नायूपेशींना योग्य प्रमाणात न मिळाल्याने वात / कफ / पित्ताचा प्रभाव शरीरात वाढतो. वेगवेगळे विकार सुरू होतात. खाली दिलेल्या सूचनांचा वापर उद्यापासून लगेच सुरू करा. पहिल्या दिवशीच डोके जड होणे किंवा शिंका येणे ६०% पेक्षा अधिक प्रमाणात कमी झालेले आढळेल. सूर्यनमस्काराची साधना ध्यानधरणेसाठी पूरक आहे हे शंभर टक्के बरोबर आहे. शरीर-मन-चैतन्य या तीनही स्तरावर सूर्यनमस्काराचा प्रभाव सारख्याच प्रमाणात होतो. शरीराला होणारी दमछाक लगेच मोजता येते किंवा ताबडतोब लक्षात येते. मन आणि चैतन्य (सूक्ष्म शरीर ) याच्यावर झालेला परिणाम मात्र मोजता येत नाही व लगेच जाणवत सुद्धा नाही. पण तो निश्चितपणे होतो हे आपल्यापेक्षा इतरांना अधिक जाणवते. म्हणूनच सूर्यनमस्कार करतांना मन व श्वसन (चैतन्य) यांच्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. दीर्घ श्वसनातून या गोष्टी शक्य होतात. यासाठी शरीराला दीर्घश्वसनाचा सराव सूर्यनमस्कार साधना सुरू करण्यापूर्वी द्या. म्हणजे स्नायूपेशींना श्रम करण्यासाठी मनाची साथ सुद्धा आपोआप मिळेल. प्राथमिक उपचाराबाबत काही सूचना- आज आणि उद्या रात्री झोपण्यापूर्वी रेचक घ्या. तीन चार दिवस गरम दूध हळद रात्री झोपतांना घ्या. कफकारक प्रकृती असल्यास गूळ-तूप- हळद एकत्र करून ठेवा. दिवसातून तीन वेळा, तीन दिवस घ्या. पावसाळा किंवा हिवाळ्यात हा त्रास होत असल्यास जेवण झाल्यावर गरम पाणी प्या. दूध, दही, दुधाची मिठाई, इतर गोड पदार्थ, तळलेले पदार्थ, चिंच, लिंबू यांचा वापर काही दिवस बंद ठेवा. रात्री झोपतांना पायांना एरंडेल तेल चोळा. सूर्यनमस्कार एक साधना २३७