पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दररोज नित्यनेमाने करा. तुम्ही तुमच्या अंत्ययात्रेचे निमंत्रण स्वतःच्या पायाने गावभर फिरून सर्वांना द्याल. अंतिम श्वासाच्या अगोदर पाच मिनिटे स्मशानात स्वतः पोहचाल. सुखे सांडणे या देहाचे करावे। समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे ।। हे तुमचे मागणे मान्य होईल. मार्तंडवंशावतंस प्रभुरामचंद्राप्रमाणे सूर्योपासना करणे हीच खरी समर्थांची पाद्यपूजा आहे. श्री. भागवत अण्णांनी आयुष्यभर समर्थांची पाद्यपूजा याप्रमाणे केली. शेवटही सुखाचा झाला. जांब समर्थ येथील समर्थ मंदिराची पहिली पायरी स.भ.कै भागवत आण्णांची आहे. त्याची स्मृती जागती ठेवावी त्यांच्या संदेशाची आठवण ठेऊन सूर्यनमस्कार घालण्याची प्रेरणा आपल्याला मिळावी हा त्यामागील हेतू आहे. प्रश्न- अ) सूर्यनमस्कार घातल्यावर किंवा घालतांना खूप शिंका येतात. त्या दिवसभर चालू असतात. याचे कारण काय ? यावर उपाय काय ? कृपया मार्गदर्शन करावे. ब) सूर्यनमस्काराची साधना ध्यानधरणेसाठी पूरक आहे म्हणून सूर्यनमस्कार घातल्यानंतर प्राणायाम व ध्यानधारणा करतो. पण मन शांत ठेवता येत नाही. डोके जड होते. सर्व रक्त प्रवाह डोक्यामध्ये उतरल्याचे जाणवते. योगनिद्रेत पडून राहिलो तरी फरक पडत नाही. असे का होते? यावर काही उपाय सांगता येतील कां? कृपया मार्गदर्शनकरावे. शंका समाधान- या दोन्ही प्रश्नांचा उहापोह एकत्रितपणे करण्याचा प्रयत्न करतो. कारण परिणाम दोन असले तरी त्या मागील कारण मात्र एकच आहे. कारण दूर झाले की परिणाम आपोआप गळून पडतील. ऋतु बदलतांना हवामानात एकदम बदल होतो. त्यामुळे नवीन साधकांना सूर्यनमस्कार घातल्यावर या प्रकारचा त्रास होऊ शकतो. नवीन हवामानाशी जुळवून घेतांना शरीरामधील कफ / पित्त यांचे असंतुलन होते. यामुळे स्नायूंना शैथिल्य येते. क्षमता क्षीण झाल्यामळे व्यायाम करण्यासाठी शरीर उत्सुक नसते. सूर्यनमस्कारामध्ये स्नायूंना होणारे श्रम व त्यांना मिळणारा प्राणतत्त्वाचा सूर्यनमस्कार एक साधना २३६