पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वायूसुत्राच्या जोड्या रक्ताभिसरणाची क्रिया सर्वदूर प्रभावीपणे करण्यास सुरूवात करतात. मेरुदंडाचे हे आरोग्य म्हणजे दृष्य स्वरुपातील आपला उत्साह होय. सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्गामध्ये आपण करन्यासाची कृती केली. कर्मेन्द्रियांना मनाची साथ देऊन स्नायूपेशींच्या केंद्रापर्यत विशिष्ट पध्दतीने दाब पोहचवला. या दाबामुळे स्नायूपेशींच्या केंद्राचे स्फुरण पावणे वाढले. त्यांची प्राणतत्त्व स्वीकारण्याची क्षमता वाढली. या ठिकाणी ऊर्जा तयार झाली. ती ऊर्जाशक्ती- चुंबकीय आकर्षण- आपल्याला हातावर जाणवली. ही छोटीशी कृती करतांना आपण स्नायूपेशीवरील दाब, मनाची एकाग्रता आणि प्राणतत्त्व यांची सांगड घातली व ऊर्जेचा स्त्रोत अनुभवला. हाच अनुभव प्राणायाम करतांना प्रत्येक श्वसन करते वेळी स्वीकारला पाहिजे. याचाच अर्थ श्वसनसंस्था, शरीरक्षमता व मनाची एकाग्रता एकमेकांना पूरक आहेत. प्रत्येकाची प्रगती स्वतंत्रपणे न होता ती एकत्रितपणे होते. एकाला मरगळ आली की त्याचा परिणाम इतर दोन घटकांवर होतोच होतो. सूर्यनमस्कार साधनेत या तीन घटकांची क्षमता वाढविण्याचा जोरदार प्रयत्न जाणिवपूर्वक केला जातो. त्यामुळे जेवढा परिणाम शरीरावर होतो तेवढाच तो मन व श्वसनसंस्थेवर सुद्धा होतो. यामुळेच सूर्यनमस्कार साधनेस सर्वांगसुंदर व्यायाम म्हणून संबोधले जाते. धर्मार्थकाममोक्षाणां आरोग्यं मूलमूत्तमम् । धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे चार पुरूषार्थ आहेत. ते मिळविण्यासाठी आरोग्य हा मूळ पाया आहे. आरोग्य नसेल तर यशोदेवी दूर पळेल, दारिद्र्य मात्र पाळतीवर असेल. सूर्यनमस्कार घातले म्हणजे कोणताच रोग होणार नाही असे गृहित धरणे अयोग्य आहे. पण एवढे मात्र निश्चित की सूर्यनमस्कारामुळे रोगप्रतिकार शक्ती अमाप वाढलेली असते. काही रोग-व्याधी झाल्यास त्याचे समूळ निवारण सत्वर आणि कायमचे होते. अकाल मृत्यूच्या भयापासून मुक्तता मिळते. समर्थांचे जन्म गाव श्री क्षेत्र जांब समर्थ येथे दर्शनासाठी गेलो होतो. तेथील भूतपूर्व पुजारी कै. विठ्ठल भागवत (अण्णा) सर्वच समर्थ भक्तांप्रमाणे सूर्यनमस्कार साधक होते. सूर्यनमस्कार साधनेतून आपल्या सद्गुरूंची (आत्मारामची) पाद्यपूजा न चुकता दररोज करा. हा समर्थांचा संदेश ते सर्वांना पोटतिडकीने देत. सूर्यनमस्कार ही एक अलौकिक साधना आहे. ही उपासना सूर्यनमस्कार एक साधना २३५