पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करण्याची आवश्यकता भासते. कर्करोग, हार्निया इत्यादी विकार पुनःपुन्हा उद्भवतात वगैरे. ही औषधे जेवढी गुणकारी तेवढेच त्यांचे शरीरावर होणारे दुष्परिणामही घातक आहेत. हे सर्वांनाच माहीत आहे. आयुर्वेदिक औषधे वात-कफ-पित्त हे तीन दोष सम स्थितीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवितात. रोगाच्या मुळापर्यंत परिणाम करतात. सूर्यनारायणाला रसाधिपती म्हणतात. तो सर्व रसांचा, औषधांचा निर्माण करणारा आहे. या औषधांचा परिणाम संथ गतीने पण हमखास होतो. दीर्घकाल टिकतो. विकार नाहीसे होतात. म्हणून या विश्वातील सर्वश्रेष्ठ वैद्यराज सूर्यनारायणाची पूजा सूर्यनमस्कार साधनेतून करायची आहे. औषध-उपचारामध्ये पडणाऱ्या मर्यादा या रुग्णाच्या क्षमतेवर अवलंबून असतात. त्याची शरीर क्षमता क्षीण असल्यास किंवा मानसिकता औषध- उपचार, पथ्य-पाणी याला प्रतिकूल असल्यास औषधांचा अपेक्षित परिणाम होत नाही. शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी स्नायुंना वेगवेगळ्या हलक्या व्यायाम प्रकारातून चालना दिली जाते. औषधांचा गुणधर्म व स्नायुंची ताकद यातून रोग आटोक्यात येतो. हळूहळू बरा होतो. व्यायाम वाढता ठेवा औषधाची मात्रा कमी करा हा सल्ला रुग्णाला मिळतो. पक्षाघात, हृद्रोग, मज्जातंतू इत्यादी आजारात काही स्नायूंची हालचाल करण्याची क्षमता फारच मंदावते. त्यामुळे त्यांना व्यायाम देण्याचा प्रयत्न करता येत नाही. एक वेळ अशी येते की औषधांचा शरीरावर होणारा परिणामही शुन्याच्या पातळीवर पोहचतो. यानंतर औषधे घेण्याचा काहीच फायदा नसतो. अशावेळी रुग्णाला सल्ला मिळतो - शरीराची ताकद आतून वाढविण्याचे मनावर घ्या. मनाचा उत्साह व शरीराची क्षमता यामध्ये सुधारणा करावयाची झाल्यास त्यासाठी प्राणायाम अत्यंत परिणामकारक आहे. प्राणायामाने नाडी शोधन होते. मेरुदंडाला सर्पाकृती नैसर्गिक आकार असतो. या नैसर्गिक आकाराला बाधा आल्यास त्यातील मणक्यांमध्ये असलेल्या मज्जातंतूवर वेडावाकडा ताण पडतो. त्यामुळे शरीरातील प्राणतत्त्वाचा प्रवाह सुखरूप होत नाही. शरीराला त्रास सुरू होतो. प्राणायामाने हा नैसर्गिक आकार प्रस्थापित होतो. मेरुदंडातून गेलेल्या सूर्यनमस्कार एक साधना २३४