पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आवश्यक असते. विश्वातील ग्रह-तारे, इतर पंचमहाभूते हे आपल्या शरीरावर परिणाम करतात. (संदर्भ घ्या- उत्तरार्ध सूर्यनारायण आणि ज्योतिषशास्त्र) त्यांच्या विशिष्ट स्वभावाचा-वर्तनाचा परिणाम आपल्या शरीर आणि मनावर होतो. हे परिणाम अनुकूल असल्यास आपल्या भाग्याला कारक असतात, प्रतिकूल असल्यास ज्योतिषशास्त्र त्यावर उपाययोजना सुचवतात. या प्रतिकूल परिणामांची तीव्रता किती आहे. तसेच त्यावर उतारा म्हणून केलेले उपाय-उपचार कितपत यशस्वी होतील या फलनिष्पत्तीचे भाकीतही कुंडलीमध्ये केलेले आढळून येते. पिंडी ते ब्रह्मांडी असे आपण म्हणतो. ॥ यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्क्वचित् ।। संपूर्ण विश्वामध्ये जे जे काय आहे ते ते सर्व आपल्या शरीरात आहे. जे येथे नाही ते कोठेही सापडणार नाही. या न्यायाने बघितले तर सर्व रोगांचे जीव-जंतू - जीवाणु शरीरामध्ये आहेतच. या शरीररुपी राज्याची संरक्षण यंत्रणा सुसज्ज नसेल तर कोणत्याही बेसावध क्षणी शत्रूजीवाणू आक्रमण करून राज्य खालसा करतील. हे रामराज्य (आत्मारामाचे राज्य) सुरक्षित राहावे, अबाधित राहावे यासाठी ज्या काय उपाय योजना आहेत त्यामध्ये आयुर्वेदशास्त्र ही एक महत्वाची संरक्षक उपाययोजना आहे. संपूर्ण विश्वामध्ये जन्म-मृत्यूचे आवर्तन (मंडल मध्यवर्ती) सतत गतीमान आहे. जे जे उत्पन्न झालेले आहे, जन्माला आलेले आहे ते नाश पावणार आहे. मंडलाचे हे शेवटचे टोकच पुढील आवर्तनाची सुरूवात असते. जन्मापासून सुरू झालेली ही प्रक्रिया पुनर्जन्मापासून पुन्हा सुरू होते असे आपण मानतो. हा मधला कालावधी सुखाचा व्हावा, सर्व विश्वामधे रामराज्य प्रस्थापित व्हावे यासाठी जे प्रयत्न आहेत त्यात औषधोपचाराला महत्व आहे. औषधशास्त्र अनेक प्रकारची आहेत. प्रत्येकशास्त्राला मर्यादा असतातच त्याप्रमाणे औषध शास्त्रालाही मर्यादा आहेत. अॅलोपॅथी औषधे घेण्यास सुरूवात केल्यावर रोग-व्याधी-विकारांची लक्षणे झपाट्याने कमी होण्यास सुरूवात होते. हा अनुभव सर्वांनाच आहे. ही औषधे त्वरित आराम देणारी आहेत. पण रोग समूळ नष्ट करण्यासाठी या औषधांचा उपयोग यशस्वी होतोच असे नाही. उदाहरणार्थ हृदयविकारात एकदा केलेली बायपास सर्जरी कालांतराने पुन्हा सूर्यनमस्कार एक साधना २३३