पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंका समाधान- एकदा व्याख्यान संपल्यावर या आशयाचा प्रश्न मला विचारण्यात आला. माझ्या पद्धतीने या शंकेचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मी केलेले स्पष्टिकरण इतरांना पटलेले दिसले पण प्रश्नकर्त्याच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह तसेच होते. त्याचा विश्वास ठाम होता. जो सूर्यनमस्कार घालतो त्याला कोणताही रोग होत नाही. त्याची अविचल श्रद्धा इतरांच्या दृष्टीकोनातून अडमुठेपणा होता पण माझ्या दृष्टीने एकाग्र निष्टेचे आदर्श उदाहरण होते. जन्मोजन्मी झालेल्या संस्कारांचा हा परिणाम होता. तो पुसला जाणे किंवा विस्मृतीत जाणे शक्य नाही. सदगुरूने केलेले मार्गदर्शन हे अंतिम सत्य. त्याला पर्याय नाही. ते ब्रह्मवाक्य! हा विश्वास ठाम होता. सकळ दोषांचा परिहार। करिता सूर्यास नमस्कार । स्फूर्ती वाढे निरंतर्| सूर्यदर्शन घेता || अध्यात्माच्या दृष्टीकोनातुनही आपल्याला होणारे रोग-व्याधी-विकार हे पूर्वनियोजित नाहीत. कारण ब्रह्माने केलेली सर्व उत्पत्ती ब्रह्मानंदातून झालेली आहे. ब्रह्मानंद देणारी आहे. सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च ।। तेथे दुःखाला जागा नाही. श्रीमद दासबोध १६.२ या ब्रह्मांडातील सर्व चल-अचल, सजीव-निर्जीव यांच्या उत्पत्तीचा आधार वात-पित्त-कफ हे त्रिदोष आहेत. या त्रिदोषांमध्ये असंतुलन निर्माण झाल्यास रोग-व्याधी सुरू होतात. फक्त वात तत्त्वाचे असंतुलन असल्यास शरीरास होणारा त्रास प्रथमोपचारानेही बरा होतो. कफ आणि वात या दोन्ही तत्त्वामध्ये असंतुलन असल्यास शरीरास होणारा त्रास वैद्यकीय दृष्टीकोनातून परीक्षण - निरीक्षण - औषधोपचार तसेच पथ्यपाणी करून प्रयत्नाने कमी होतो. बरा करता येतो. पित्त, कफ, वात या तीनही तत्त्वांमध्ये असाधारण असंतुलन असल्यास मात्र शरीरास होणारा त्रास बरा करणे फार अवघड होते. शरीररूपी घटाकाशाला तडा जाऊन ते पंचमहाभूतामध्ये विलीन होण्याची शक्यता असते. अव्यक्त विश्वातील आपले अस्तित्व सुरू होण्यासही हे त्रिदोषच कारणीभूत असतात आणि प्रत्यक्ष शरीर रुपाने जन्म घेण्यासाठीसुद्धा या त्रिदोषांचे ऐक्य सूर्यनमस्कार एक साधना २३२