पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- एकाग्र राहता येणे याला त्या आसनातील आसनजय म्हणतात. योगासनांचा वापर व्यायाम म्हणून करावयाचा झाल्यास प्रत्येक आसन साधारण पाच-एक मिनिटे तरी करणे अपेक्षित आहे. म्हणजेच त्या आसनामध्ये योग्य त्या स्नायूपेशींना विशिष्ट ताण-दाब देऊन किमान पाच एक मिनिटे आरामात स्वस्थ - शांत- एकाग्र राहता आले पाहिजे. सूर्यनमस्कारामध्ये एकूण शरीर स्थिती बारा व आसन प्रकार आठ येतात. सूर्यनमस्कारातील आसनांचा व्यायाम म्हणून सराव करावयाचा झाल्यास साधारणपणे चाळीस ते साठ मिनिटे एक सूर्यनमस्कार घालण्यास लागतील. असे असले तरी सूर्यनमस्काराचा सर्वसाधारण वेग एक मिनिटाला एक सूर्यनमस्कार असा सांगितला जातो. गतीयुक्त सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये घातले जातात. तसेच ते शरीर वृद्धीसाठी उपयोगी पडतात. बारा शरीर स्थितीचा एक सूर्यनमस्कार चार श्वासोच्छ्वासात घालता येतो. या पेक्षा अधिक वेळ लागत असल्यास तो गतीरोधून केलेला सूर्यनमस्कार होतो. पाच व सहा क्रमांकाच्या दोन्ही शरीरस्थिती बळाचा वापर करून ताकदीने करता येतात. श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये ही दोन्ही आसने एका दमात घालायची आहेत. याच प्रकारचा अनुभव दहा अकरा आणि बारा ही स्थिती करतांना जाणवतो. पादहस्तासनाची उच्चतम अवस्था आपल्या क्षमते प्रमाणे घेतल्यावर जोरात श्वास घेऊन उभे रहा व अर्काय नमः व भास्कराय नमः ची कृती करा. पुस्तकामध्ये श्वसनाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या गतीयुक्त सूर्यनमस्काराच्या आहेत. कारण सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्गात प्रथम भागामध्ये नियंत्रित गतीने सूर्यनमस्कार कसे घालायचे याचा प्रात्यक्षिकासह सराव करून घेतला जातो. सूर्यनमस्कार स्थूल शरीर व सूक्ष्म चैतन्य याची पूजा आहे. ती एक साधना आहे. या स्वयंसाधनेतील सूचना आत्मारामाकडून कशा मिळतात, त्यांचा स्वीकार कसा करायचा इत्यादीचे मार्गदर्शन केले जाते. हा प्रकार एकदा आत्मसात झाला की गतीयुक्त सूर्यनमस्कार सुरू होतात. हा भाग प्रशिक्षणाच्या प्रणामासन, ऊर्ध्वहस्तासन, हस्तपादासन, अश्वसंचालनासन, मकरासन, साष्टांगनमस्कारासन, भुजंगासन, पर्वतासन ही आठ आसने येतात. अधोरेखित केलेली आसने दोनदा येतात. सूर्यनमस्कार एक साधना 6 २२९