पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रश्न - - अ) सूर्यनमस्कार घालतांना पाच आणि सहा या स्थितीमध्ये श्वास सोडा असे दिलेले आहे. त्यामुळे घोटाळा होतो. या दोन्ही आसनामधील श्वसन पद्धती कृपया स्पष्ट करा. ब) सूर्यनमस्कार घालतांना श्वासाकडे लक्ष द्या किंवा श्वास सोडण्याकडे / घेण्याकडे लक्ष द्या म्हणजे काय करायचे हे लक्षात येत नाही. कृपया मार्गदर्शनकरावे. शंका समाधान - अ) हा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो. मकरासन झाल्यानंतर आपण साष्टांगनमस्कार या आसन स्थितीमध्ये येतो. या दोन्ही आसनासाठी श्वास सोडा व श्वास सोडा (कुंभक करा) अशा दोन सूचना क्रमाने दिलेल्या आहेत. नियमाप्रमाणे कृती होत नसणार किंवा नियम एक आणि कृतीमात्र वेगळी अशी परिस्थिती असणार. मग दोघांचा ताळमेळ कसा बसणार? सिद्धांत आणि सराव यामधील फरक का पडतो हे समजून घ्यावयास हवे. विभाग दोन कार्यपुस्तिका यातील ब्रह्मकर्मांर्तगत नित्यकर्म प्रथम दिवस ( दैनदिन सूर्यनमस्कार प्राथमिक सूचना) वाचा त्याप्रमाणे सराव करा. या प्रश्नाचे उत्तर प्रात्यक्षिकासह लगेच लक्षात येईल. सूर्यनमस्काराचे अनेक प्रकार आहेत. त्यांचा उल्लेख यापूर्वी आलेला आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यातील दोन प्रकारांचा विचार करू. ते आहेत नियंत्रित गतीने सूर्यनमस्कार घालणे आणि गतीयुक्त (स्पर्धेमध्ये घालतो तसे) सूर्यनमस्कार घालणे. पहिला आहे शरीर शुद्धीसाठी. दुसरा आहे शरीर वृद्धी साठी. नियंत्रित गतीने सूर्यनमस्कार घालणे म्हणजे सावकाश संथ गतीने प्रत्येक आसन करणे. सूर्यनमस्कार ही योगासनाची शृंखला आहे. 5 त्याला श्वासाचा ताल व मेरुदंडाची गती आहे. आसन या शब्दामध्ये स्थिर+सुखम् + आसन हे तीन शब्द गृहित धरलेले आहेत. तीन तास एका आसनामध्ये आरामात स्वस्थ- -शांत- 5 ही ताल-गती-शक्ती म्हणजे आपल्या शरीरातील मेरुदंडाचे सामर्थ्य. ही झाली आपली कुंडलिनी शक्ती. प्रकृतीच्या कुंडलिनी शक्तीचे प्रतिक नाग आहे. पृथ्वीला शेषाचा, आपल्याला मेरुदंडाचा आधार आहे आणि दोन्हीचे शेषशायी भगवान हे अधिष्ठान आहे. सूर्यनमस्कार एक साधना २२८