पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेवटच्या प्रात्यक्षिकात करून घेतला जातो. त्याला नावही ब्रह्मकर्मांर्तगत नित्यकर्म प्रथम दिवस असे दिलेले आहे. दररोजची सूर्यनमस्कार साधना या पद्धतीने करावी अशी अपेक्षा आहे. ब) सूर्यनमस्कार घालतांना श्वासाकडे लक्ष द्या किंवा श्वास सोडण्याकडे / घेण्याकडे लक्ष द्या म्हणजे काय करायचे हे लक्षात येत नाही. कृपया मार्गदर्शनकरावे. प्रश्नाचा दुसरा भाग श्वसन पद्धतीच्या दिलेल्या सूचना याबाबत येतो. खरं म्हणजे आपली प्रत्येक हालचाल - शारीरिक कृती, मानसिक विचार - ही श्वसनावर बेतलेली असते. कुंभक करतांना आत घेतलेला किंवा बाहेर सोडलेला श्वास तसाच रोखून धरला जातो. यावेळी हृदयाला तसेच शरीरातील मासपेशींना विश्रांती मिळते. मनाचे माकडचाळे कमी होतात. हा अनुभव आपण प्राणायामाचा सराव करतांना घेतलेला आहे. याचाच अर्थ श्वासावर नियंत्रण ठेऊन- स्थूल शरीर व सूक्ष्म चैतन्य- यांच्यावर अपेक्षित परिणाम आपल्याला सिद्ध करता येतात. वर केलेल्या विवेचनावरून ब्रह्मकर्मांतर्गत असलेल्या नित्यकर्म सूर्यनमस्कार साधनेचे सर्व फायदे मिळविण्यासाठी श्वसनाबद्दल दिलेल्या सूचना फार महत्त्वाच्या आहेत हे लक्षात येते. त्याच बरोबर या श्वसनक्रिया नैसर्गिक आहेत. प्रत्येक कृती करतांना लागणारा वेळ लक्षात घेता श्वास देणे-घेणे याच पद्धतीने अनेक वेळा होणार आहेत हेही तितकेच खरे आहे. मग तरीही या श्वसनाच्या सूचना कशासाठी? सूर्यनमस्कारातून आपल्याला प्राणायामाचे सर्व फायदे मिळतात. या विधानाचा व्यावहारिक परिभाषेतील अर्थ आहे, शरीराला प्राणत्त्वाचा पुरवठा अधिक प्रमाणात स्वीकारण्याची सवय लागते. त्यामुळे रक्ताभिसरणाची क्रिया सुधारते. प्रत्येक पेशीकेंद्र सशक्त होते. रोग प्रतिकार शक्ती वाढते. संपूर्ण आरोग्य सुधारते. कामाचे तास वाढतात. अधिक प्रयत्न करता येतात. त्यातून यशश्री तुमची होते. इच्छितमनोकामना पूर्ण करण्याची सिद्धी प्राप्त होते. अर्थात हे सर्व घडून येण्यासाठी प्राण व शरीर यांची योग्य ती साथ-संगत आवश्यक आहे. करन्यासाची कृती करतांना स्नायूपेशींवर दाब दिला. या शारीरिक बळाला मनाची जोड दिली. योग्य त्या सूचना देऊन हा दाब पेशीकेंद्रापर्यंत पोहचविला. त्यामुळे आपल्याला या प्राणतत्त्वाचे स्फुरणपावणे दोन्ही तळहातावरील सूर्यनमस्कार एक साधना २३०