पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकार आवश्य करा. त्यासाठी अधिक वेळ द्या. (सूर्यनमस्कार दोन दिवस घातले नाहीत तरी चालतील.) दीर्घ श्वसनाचा परिणाम मणक्यामधून गेलेल्या सर्व मज्जातंतूवर होतो. यामुळे मेरुदंडाचा नैसर्गिक आकार प्रस्थापित होण्यास मदत होते. मज्जातंतुंच्या या जोडया सर्व शरीरात पसरलेल्या आहेत. त्यामुळे रक्ताभिसरणात सुधारणा होऊन स्नायुंचे दुखणे थांबते. प्राणायामाचा सराव नसल्यास दीर्घ श्वसन किंवा / आणि ॐ कार याचा सराव करा. सूर्यनमस्काराला पूरक असलेले प्राणायाम, सरावसत्र दिवस दुसरा यातील प्रकारांचा सराव करा. भस्त्रिका प्रकार दोन - (अग्नीसार क्रिया) आणि भस्त्रिका प्रकार तीन प्रत्येकी (अ-ब-क) तीन वेळा करा. सूर्यनमस्काराला पूरक असलेले प्राणायाम, सरावसत्र दिवस तिसरा मार्जरासन जमेल तसे तीन- पाच-सात वेळा करा. त्रास होणार नाही याकडे लक्ष द्या. सद्गुरूवंदन मनोभावे करा. सरळ उभे राहतांना पर्वतासन कमरेकडे लक्ष देऊन व्यवस्थित करा. प्राणतत्त्व वायूच्या माध्यमातून शरीरास मिळते. वायूला पर्यायी शब्द मन असा आहे. शक्ती असा आहे. झोप संपलेली आहे. जाग आलेली आहे. पण जोपर्यंत मनाची तयारी नाही तो पर्यंत बिछाना सुटत नाही. म्हणून कोणतीही कृती करण्याची निकड प्रथम स्नायुंनी मनावर घेणे गरजेचे आहे. हे स्नायु-मन किंवा स्नायु-उत्साह जागे करण्यासाठी त्याला वायुची शक्ती देणे गरजेचे आहे. त्यासाठी हळूवारपणे स्नायुंच्याच मदतीने प्रयत्न करा. स्नायुंना दिलेले श्रम व त्यांना मिळणारा प्राणतत्त्वाचा पुरवठा यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न दीर्घ श्वसनातून होतो. त्याचा सराव अधिक वेळ करा. कोणत्या आसनात चूक झालेली आहे हे निश्चित झाल्यानंतर ते करण्याची पद्धती कार्यपुस्तिकेतून वाचा. त्यातील प्रथम कौशल्याचा उपयोग करून हे आसन हळुवारपणे घालता येईल. सूर्यनमस्कार एक साधना २२६