पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्वासाकडे संपूर्ण लक्ष द्या. एका आसनामध्ये अनेक वेळा श्वास घ्यायचा / सोडायचा आहे. लक्ष फक्त सोडण्याकडे किंवा घेण्याकडे ठेवायचे आहे. आपल्या क्षमतेप्रमाणे आसनातील उच्चतम स्थितीला आल्यानंतर विशिष्ट स्नायूंवर दिलेला ताण- दाब स्वीकारा शरीराचे इतर स्नायू ताण-दाब रहित ठेवा. थोडावेळ थांबा. नंतर ताण / दाब दिलेले स्नायू मोकळे करा. स्नायू कोठून मोकळे होतात याकडे लक्ष द्या. ज्या स्नायुंना ताण / दाब दिलेला आहे तेच स्नायू मोकळे होत आहेत हे पहा. ज्या स्नायुंना ताण-दाब देणे अपेक्षित नाही तरी ते स्नायू मोकळे होत असतील तर तेथे वेदना सुरू होतील. या आसनामध्ये आणि या ठिकाणी तुमची चूक झालेली आहे हे लक्षात घ्या. पाठ किंवा कंबरेचे नक्की कोणते स्नायु दुखतात हे कळाले तर चूक शोधणे सोपे होते. दुखऱ्या स्नायुंची स्थान निश्चिती करण्यासाठी प्रत्येक आसन आपण बरोबर करतो आहोत किंवा नाही हे तपासणे गरजेचे आहे. चूक शोधण्यासाठी साधारणपणे खालील सूचना लक्षात घेतल्यास शोधकार्य लवकर यशस्वी होईल. प्रणामासन- कंबरेचे मध्यभागातील स्नायू; ऊर्ध्वहस्तासन, भुजंगासन - खांदा, संपूर्ण कंबर; हस्तपादासन - पाठ, कंबर, खांदे, मान, गुडघे; अश्वसंचालनासन- कंबरेची उजवी किंवा डावी बाजू: मकरासन - खांदे, कोपर, मनगट, घोटे, पोट-या; साष्टांगनमस्कारासन - पोटाचे स्नायू व कोणतेही सांधे; पर्वतासन- पोट-या, हात; दीर्घ श्वसन- पाठ, कंबर, मानेचे स्नायू प्राथमिक उपचाराबाबत काही सूचना - आज आणि उद्या रात्री झोपण्यापूर्वी रेचक घ्या. तीन चार दिवस गरम दूध हळद रात्री झोपतांना घ्या. कफकारक प्रकृती असल्यास गूळ-तूप- हळद एकत्र करून ठेवा. दिवसातून तीन वेळा, तीन दिवस घ्या. कफदोषामुळे स्नायू दुखत असल्यास आराम पडेल. सूर्यनमस्कार साधनेसाठी पूरक असलेले दीर्घश्वसनाचे (प्राणायामाचे) सर्व सूर्यनमस्कार एक साधना २२५