पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रथम तीनही प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात देतो. त्यानंतर सविस्तर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. तसेच उपचार घेण्याची पद्धती सांगतो. सूर्यनमस्कार साधनेस सुरुवात केल्यानंतर ही पाठ / कंबर दुखणे सुरू झाली असल्यास डॉक्टरकडे उपचारासाठी जाण्याची गरज नाही. सूर्यनमस्कारामध्येच हा उपचार अंतर्भूत आहे. तो घेण्यास लगेच उद्याच सुरूवात करा. पहिल्याच दिवशी स्नायुंच्या वेदना किती टक्क्याने कमी झाल्या ते कळवा. पाठ / कंबर दुखत असूनही आपण सूर्यनमस्कार चालू ठेवलेले आहेत या बद्दल आपले अभिनंदन. सूर्यनमस्कार घालतांना मेरूदंडाला मिळालेला अनावश्यक व अयोग्य ताण-दाब यांचे हे परिणाम आहेत. झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी शरीर दिवसभर चांगले काम करते आहे. पण पुन्हा त्याच प्रकारची चूक सकाळी होते आहे. चूक कोणत्या आसनामध्ये झालेली आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. हा चुकीचा ताण - दाब तुमच्या स्नायुंवर पडलेला आहे. तो नक्की कोठे याचा अंदाज मला या ठिकाणी बसून करता येणार नाही. दुखणे नक्की कोठे आहे व चूक कोणती झालेली आहे हे शोधण्यासाठी मी फक्त काही पर्याय देऊ शकतो. सूर्यनमस्कार घालतांना ते तपासून पहा. चूक सापडल्यावर विरुद्ध ताण देण्याचा उपचार सुरू करा. तो योग्य आहे किंवा नाही हे ताबडतोब कळेल. समत्वं योग उच्चते। (श्रीमद्भगवद्गीता) परस्पर विरोधी घटकांना सम स्थितीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे योग साधणे होय. सूर्यनमस्कारामध्ये सर्वच स्नायूपेशींना उलट-सुलट ताण आणि दाब सातत्याने दिले जातात. यामुळे त्यांना त्रास न होता हळू हळू त्यांची लवचिकता वाढते. ताण- दाब सहन करण्याची क्षमता हीच स्नायूंची खरी ताकद असते. सूर्यनमस्कार घालतांना ताण- दाब देतांना झालेली चूक कोणत्या आसनामध्ये झाली याचा शोध घेण्यासाठी एकच सूर्यनमस्कार सावकाश शांतपणे घाला. सूर्यनमस्कार घालतांना प्रत्येक आसनामधील ऊर्जाचक्राकडे संपूर्ण लक्ष सूर्यनमस्कार एक साधना द्या. २२४