पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याला मात्र वेळ लागणार आहे. (साधारणपणे पाच मिनिटे) त्यापूर्वी खाण्याचा प्रयत्न केल्यास पोटात डचमळून येईल. यानंतर काही वेळाने खाल्लेल्या अन्नाचा पोट स्वीकार करेल पण पचनामध्ये मात्र अडचणी व अडथळे येतील. म्हणून सूर्यनमस्कार साधना संपल्यावर साधारणपणे पंधरा-वीस मिनिटे थांबून अन्न सेवन करावे असे म्हणता येईल. सूर्यनमस्कारामुळे घशाला कोरड पडली असल्यास घोटभर कोमट पाणी घ्यावयास हरकत नाही. कोमट पाणी शक्य नसल्यास एक चमचा साधे पाणी तोंडात सोडावे. यामुळे अन्ननलिका मऊ आणि ओली होईल. पोटापर्यंत पाणी पोहचणार नाही. त्रास होणार नाही. सूर्यनमस्कार आटोपून तयार होऊन लगेच इतर कामासाठी घराबाहेर पडायचे आहे. उशीर झालेला आहे. असे असल्यास योगनिद्रा ( शवासनामधील विश्रांती) घ्या. स्नायूपेशींना शांत होण्यासाठी लागणारा वेळ निम्म्याने कमी करता येतो. न्याहारी घेऊन कामाला लगेच लागता येते. प्रश्न- अ) पंधरा एक दिवस झाले सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात केली. चार-पाच दिवसापासून पाठ / कंबर फार दुखते आहे. मलम तेल शेक हे उपचार चालू आहेत. सूर्यनमस्कारामुळे सुरूवातीला असा त्रास होणे नेहमीचेच आहे काय ? ब) सूर्यनमस्कार घालणे काही दिवस बंद करू का? क) डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेऊ काय ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. शंका समाधान- सूर्यनमस्कार साधनेतून सर्व प्रकारचे विकार, व्याधी दूर होतात हे सर्वश्रुत आहे. एखादा आजार किंवा विकार दूर करण्यासाठी सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात केली जाते. स्नायूंच्या मनाविरुद्ध त्यांना कामाला लावले जाते. आजारातून लवकर मुक्तता होण्यासाठी स्नायूंवर जोर-जबरदस्ती केली जाते. स्नायूंचे दुखणे सुरू होते. सूर्यनमस्कार एक साधना २२३