पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे, हे लक्षात ठेवा. • आपल्या सर्वांना सूर्यनमस्कार साधनेतून उदंड आरोग्य व आनंद प्राप्त व्हावा ही प्रभुरामचंद्रांचे चरणी प्रार्थना. सूर्यनमस्कार दैनिक सराव याबद्दलची सविस्तर माहिती भाग दोन कार्यपुस्तिका, सूर्यनमस्कार ब्रह्मकर्मांतर्गत नित्यकर्म प्रथम दिवस वाचा. क) सूर्यनमस्कार घातल्यानंतर किती वेळाने न्याहारी करावी ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती सूर्यनमस्कार घातल्यानंतर शरीरातील सर्व स्नायूपेशींची स्पंदने वाढलेली असतात. करन्यासामध्ये आपण हा अनुभव घेतलेला आहे. प्रत्येक पेशीच्या मंडलापर्यंत (अणूरेणूच्या भ्रमण कक्षेपर्यंत) सूर्यनमस्काराची प्रत्येक कृती परिणामकारक पद्धतीने पोहचलेली असते. या 'मंडल मध्यवर्ती' असलेल्या सवितृदेवतेचे / सूर्यनारायणाचे ध्यान आपण केलेले आहे. ही ध्यानधारणा आपण किती ताकदीने आणि मनापासून केलेली आहे यावर स्नायूपेशीमंडलाचे स्पंदन अवलंबून आहे. ताकदीने करणे याचा अर्थ किती स्नायूंपेशींना या साधनेची संधी आपण देऊ शकलो. मनापासून करणे याचा अर्थ आपण स्नायूपेशींच्या गर्भापर्यंत मनाने पोहचून त्यावर किती प्रमाणात ताण-दाब देऊ शकलो असा आहे. सूर्यनमस्कार साधना संपल्यानंतर थोड्याच वेळात छातीची धडधड थांबलेली लक्षात येते. पोट व इतर स्नायुंची भकभक सुद्धा शांत झालेली आपल्याला सहज जाणवते. पण स्नायूपेशींच्या स्पंदनामध्ये झालेली वाढ मूळपदावर आली आहे हे मात्र समजत नाही. यासाठी छाती-पोट- स्नायू शांत होण्यासाठी जेवढा वेळ लागेल त्याच्या दुप्पट-तिप्पट वेळ पेशीमंडल शांत होण्यासाठी गृहित धरावा. सूर्यनमस्कार घातल्यावर तीन सर्वसाधारण श्वास घ्या आणि समर्पणाचा श्लोक म्हणा. तुम्हाला धाप लागणार नाही. छाती लगेच शांत होईल (१ मिनिट ). शरीराला आलेला घाम जसा जिरेल/वाळेल तशी वाढलेली उष्णता कमी होईल. सूर्यनमस्कार एक साधना २२२