पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रत्येक आसनामध्ये शरीराच्या विशिष्ट भागावर दिलेला ताण - दाब याचा अनुभव घ्या. शरीराचा इतर भाग ताण- दाब रहित ठेवा. • त्या आसनामधील ऊर्जाचक्राकडे लक्ष द्या. • आपल्या क्षमतेप्रमाणे आसनातील उच्चतम स्थितीला आल्यानंतर थोडावेळ थांबा. • नंतर ताण / दाब दिलेले स्नायू मोकळे करा. स्नायू कोठून मोकळे होतात याकडे लक्ष द्या. • ज्या स्नायूंना ताण / दाब दिलेला आहे तेच स्नायू मोकळे होत आहेत हे पहा. ( इतर स्नायू मोकळे होत असतील तर तुमची ही चूक पुढील आसनामध्ये सुधारा.) • यानंतर पुढील सूर्यमंत्र म्हणून नंतरचे आसन करण्यास सुरूवात करा. • इतर दहा सूर्यनमस्कार वेळेचे बंधन न पाळता घाला. प्रत्येक आसनामध्ये पार्श्वभाग मोकळा आहे याकडे लक्ष द्या. • पहिला सूर्यनमस्कार घालण्यासाठी वापरलेली शारीरिक व मानसिक क्षमता शेवटच्या सूर्यनमस्कारापर्यंत टिकवा. +१ चा सूर्यनमस्कार घालतांना धाप किंवा थकवा यावयास नको याकडे लक्ष द्या. . सूर्यनमस्कार-प्र र - प्राणायाम सराव सत्रामध्ये शिकलेले पूरक व्यायाम प्रकार व प्राणायाम यांचा अभ्यास आठवड्यातून किमान एकदा करा. ● • सूर्यनमस्कार सरावामुळे स्नायूंचे दुखणे उद्भवल्यास एक/दोन दिवस प्राणायामाचा अभ्यास व्यवस्थित करा. ( सूर्यनमस्कार स्थगित ठेवले तरी चालेल.) ● हात व पायावरील दाबबिंदूंना कार्यरत करा. सकाळी ठराविक वेळी टाळ्या वाजवा. सूर्यदर्शन घ्या. • समजून-उमजून, जाणीवपूर्वक सूर्यनमस्कार साधनेचे तप करा. जगातील प्रत्येक कुटुंब सूर्यनमस्कार साधनेचे केंद्र व्हावे, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सूर्यनमस्काराचा प्रचार-प्रसार करणारा कार्यकर्ता व्हावा हे आपले उद्दिष्ट सूर्यनमस्कार एक साधना २२१