पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४१ ते ५० वर्षे ५१ ते ६० वर्षे २४+१ चे चार ते आठ आवर्तन समंत्रक किंवा क्षमते प्रमाणे. शक्य असेल तेंव्हा प्राणायामाचा सराव अधिक प्रमाणात. २४+१ चे दोन आवर्तन समंत्रक किंवा क्षमते प्रमाणे. प्राणायाम- योगासनांचा सराव अधिक प्रमाणत दररोज. ६१ ते १२० वर्षे २४+१ चे एक आवर्तन ते ३+१ सूर्यनमस्कार समंत्रक किंवा क्षमते प्रमाणे प्राणायाम - योगासनांचा सराव अधिक प्रमाणात दररोज. टीप - अध्यात्मामध्ये सरासरी 4 आर्युमान एकशे वीस वर्षे गृहित धरलेले आहे. ब) ब्रह्मकर्मांतर्गत नित्यकर्म असलेल्या सूर्यनमस्कार स्वयंसाधनेचा स्वीकार केल्यावर ही साधना शिकायची कशी. आत्मारामाचे मार्गदर्शन मिळवायचे कसे त्यासाठी सूर्यनमस्कार घालायचे कसे याची थोडी माहिती घेऊ करू. • स्नान झाल्यानंतर दररोज किमान १२+०१ सूर्यनमस्कार घाला. • त्यातील तीन सूर्यनमस्कार (अधोरेखित सूर्यमंत्र) प्रत्येकी पाच मिनिटांमध्ये घाला. (एकूण ०५ x ०३ = १५ मिनिटे) • ॐ मित्रायनमः । ॐ रवयेनमः । ॐ सूर्यायनमः । ॐ भानवेनमः। ॐ खगायनमः । ॐ पूष्णेनमः । ॐ हिरण्यगर्भायनमः । ॐ मरीचयेनमः । ॐ आदित्यायनमः। ॐ सवित्रेनमः । ॐ अर्कायनमः । ॐ भास्कराय नमः। श्रीसवितासूर्यनारायणायनमोनमः।। ● हे तीन सूर्यनमस्कार घालतांना प्रत्येक आसन करण्यापूर्वी सूर्यमंत्र म्हणा. • 4 नवजात अर्भकाचे हृदय फारच सशक्त असते. नाडीचे दोनशे वीस ठोके सहन करण्याची त्याची क्षमता असते. आयुष्यातील प्रत्येक वर्षाला ही क्षमता एकाने कमी होते. सूर्यनमस्कार घालतांना नाडीचे ठोके शंभरपेक्षा जास्त वाढत नाहीत. म्हणजेच वयाच्या एकशेदहा वर्षापर्यंत सूर्यनमस्कार व्यवस्थितपणे त्रास न होता घालता येतात. सूर्यनमस्कार एक साधना २२०